Rajmata Jijabai

राजमाता जिजाबाई | Rajmata Jijabai

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Rajmata Jijabai

जिजाऊचा आम्हा अभिमान.
ती महाराष्ट्राची शान
शिवबा सारिखा छावा
घडविला संस्कारे महान

अवर्षण दुष्काळाची मुजोरी
म्लेंच्छांची गुलामगिरी
खितपत पडला महाराष्ट्र
स्वाभिमान ना उरी.

स्त्रीयांची अब्रु वेशीवर
जीवन मरण संर्घष फार
दयनीय अवस्था सारी
अशातच लढली जिजाऊ
नारी.

डोहाळे लढाईचे लागले
अत्याचार निर्दालना मन
आक्रंदले
न्यायाची करण्या स्थापना
शिवबा सारिखे नररत्न
पोटी प्रसवले.

शिवबास शस्र शास्र निपुण केले
मावळ्यांना स्वाभिमाने
जागविले
नारी शक्तीचा ठेविला मान
बळीराजाचा उचित सन्मान.

जाती पातीचे केले उच्चाटन
सर्वधर्म समभाव जपुन
स्वराज्याचे स्वप्न साकारले
रामराज्य जिजाऊमुळे
अवतरले

-©वर्षा गोरे
१२/१/२२

Share

You may also like

2 thoughts on “राजमाता जिजाबाई | Rajmata Jijabai

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO