पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Shyaam Savala
प्राण मिरेचा श्याम सावळा
बालरूपी तो रांगत आला ।
यमुनाकाठी शाम दाटली
पुरे खेळ रे म्हणे मीरा ।।
आणि नभातुन बघती वाकून
किती कौतुक ते सुर स्वर्गातून ।
हवेत विरले सूर सर्वही
घंटा नादे परते गोधन ।।
मंथनी कुणी गोपी चिंतीत
स्तब्ध रवी ती स्वकरात ।
नव्हे हरी हा मागत लोणी
रवीच सखये तुझ्या अंगणी ।।
-©पुष्पा पेंढारकर
०४.०१.२२
One thought on “श्याम सावळा | Shyaam Savala”