पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Rituraj Battishi
रमवाया रसिक जना
ऋतुराजा ये दारी ।
कानात समीर सांगतो
होई धरा बावरी ।।
दशदिशात पुष्पगंध
आसमंत दाटला ।
नवपल्लव रानी वनी
हा नवाच सोहळा ।।
गुणगुणत गुंगला हा
मधूसेवनी मिलिंद ।
स्वैर फिरे विहग नभी
लाभे तया आनंद ।।
सजवितात चैत्र गौरी (Chaitra Gauri)
ललना या सुस्मिता ।
यमूनातटी वेणूनाद
देत साथ कोकिळा ।।
बघण्यास शाम सावळा
वत्स धेनू धावल्या ।
मोद मनी बहरूनी ये
सौभाग्य वाण देता ।।
-©पुष्पा पेंढारकर
१४.०१.२२
मकरसंक्रांत