Dharjin

धार्जीण | Dharjin

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Dharjin

आज जे सांगणार आहे ते ही बऱ्याच लोकांना आलेल्या अनुभवाचे बोल आहेत.

कित्येकदा बाहेरील नाहीत तर रोज घरातल्या ही गोष्टी,सांसारिक जीवनात घडत जाणाऱ्या गोष्टीनी माणूस अचंबित होऊन जातो.

बऱ्याच लोकांशी व्यवहारिक वस्तुंच नेहमी वाकड़ असत म्हणजे अगदी 36चा आकड़ा म्हणा हव तर, बऱ्याच लोकांना अस बोलताना ही ऐकलय की अमुक एक वस्तु आमच्या घरात टिकतच नाही हो त्यात झाडांचा ही समावेश आहे.

कितीही प्रेमाने आणलेली,खरेदी केलेली वस्तु घरात आणल्यावर अमूक ती वस्तु कधी टिकली नाही.

माझ्या मैत्रीणीच्या भावाच्या बाबतीत घडत असलेला कायमचा प्रसंग म्हणजे त्याने एखादी वस्तु विकत घेतली की का कोण जाणे ती घरी आणे पर्यन्त त्यात काहीतरी दोष निर्माण होणारच अगदी दूध जरी आणल तर ते घरी आणे पर्यन्त नासणारच,मुलाला खेळण घेऊन येई खेळण उघड़े तोवर ते बिघडून जाई किवा त्याचा काही पार्ट मोडला जाई,

एखाद छानस रोप आणल तर घरी आणे पर्यंत सुकून जाई अगदी मरून ही जात हे त्याला,त्याच्या घरच्याना प्रखरतेने जाणवल होत,

पुढे त्याने स्वतः वस्तु विकत घेऊन घरी आणण सोडून दिल, आता ती जबाबदारी घरातील इतर सदस्य घेतातच पण आजवर घडत असलेल्या यात काय रहस्य दडल होत कोण जाणे..

बऱ्याच वेळा अस ही ऐकिवात येत की आमच्या मुलाला गाड़ी धार्जीण नाही, तर काही जणाना वास्तु *घर धार्जीण नसत, काहीना सण वार धार्जीण नसतात काहीना घर सजावट,समारम्भ धार्जीण नसतात,काहीना स्वतःची प्रकृति स्वास्थ धार्जीण नसते.

आमच्याच विंगेत 4th फ्लोर ला एक काकू रहातात त्यांच्या मोठ्या मुलाला स्वकमाईतुन घेतलेल घर धार्जीण नाही म्हणे,त्याने एक नवा कोरा फ्लैट विकत घेतला होता आणि लग्न झाल्यावर तो आपल्या बायको मूलां सोबत त्या फ्लैट मधे रहायला गेला,पण तिथे गेल्यापासुन त्याला व त्याच्या बायका मुलांना सतत त्या फ्लैट मधे कोणीतरी आपल्यावर वॉच ठेवत असल्याचा भास होत असे, शेवटी कंटाळून तो फ्लैट विकुन दुसऱ्या फ्लैट विकत घेऊन तिथे राहायला गेला पण तिथेही तोच अनुभव,जवळ जवळ चार पाँच वेळा घर बदलून पण तोच अनुभव घेतल्यावर त्याने एक जाणकार व्यक्तीला विचारले असता त्याने सांगितले की तुम्हाला स्वतःच्या घरात शांति मिळणार नाही तेव्हा आपल्याच आई वडिलांच्या घरात किवा रेंट वर राहु शकता.

स्वकमाईतून घर विकत घेऊन रहाणे परिस्थिति असूनही, त्याच्या नशिबात नाही.

शेवटी तो परत काकूनकड़े राहायला आला, पण अस का हे त्या जाणकार व्यक्तीला ही नाही सांगता आल.

तर त्याचाच लहान भावाला

वाहन धार्जीण नव्हतं,नवीन गाड़ी घेतली की एक्सीडेंट ठरलेला अश्या त्याने तीन चार गाड्या घेतल्या सर्व गाड्यांचे एक्सीडेंट झाले पण तो मात्र दरवेळेस सुरक्षित राहीला एवढंच काय ती चांगली बाब.

असे अनेक किस्से आहेत जे मित्रां कडून त्यांच्या मित्रांसोबत घड़लेले,नात्यातील लोकां च्या बाबतीत घड़लेले आहेत सदर चे दोन्ही किस्से डोळ्यान देखत घड़लेले आहेत म्हणून विशेष सांगितले.

काहीना सणवार धार्जीण नसल्याच ही ऐकले आहे म्हणजे सण आला की घरात कधीही न होणारे वाद विवाद होतात काहीना आरास, सजावट धार्जीण नसते ती केली की अघटित घटना होतात, तर काहीना फॅमिली फक्शन धार्जीण नसतात अन्यथा अशुभ गोष्टी घडल्याच पाहील गेलय. या मागे नेमके काय कारण आहेत, ठोस पणे उत्तर अजुन नाही मिळालेली.

तर मी स्वतः बऱ्याच कुटुंबात एक तरी अशी व्यक्ति पाहिलीये की ती व्यक्ति सतत आजारी असते.खर पाहील गेल तर त्या व्यक्तीला काहीही झालेल नसते, ना कुठला गम्भीर आजार न कसल टेंशन पण सतत बर नसल्याच सांगून अंथरुण पकडून बसलेले असतात त्यांना नेमके काय झालय हे डॉक्टर्सना ही उलघडत नाही.वरुन ठनठणीत दिसणाऱ्या ह्या व्यक्ति आतून खंगत चाललेल्या असतात.

एकूण काय तर काही विशिष्ठ लोकां ना विशिष्ट गोष्टी धार्जीण नसतात या मागे काय गुपित आहे,हे ही एक न उलघडलेल रहस्य आहे.

प्रथम वाडकर

धार्जीण | Dharjin हा कथा अवडला असल्यास शेअर करा.

धार्जीण | Dharjin – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share धार्जीण | Dharjin

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO