Happy dawn

आनंदी पहाट | Happy dawn

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Happy dawn

अमृत वर्षावी शारदीय पौर्णिमेची

सुखी, सुसंपन्न.. शांततामय जीवन हवे तर हवे सत्य ज्ञान. आज हेच ज्ञान देण्यासाठी प्रत्यक्ष लक्ष्मी देवी पृथ्वीवर “को जागर्ती” अर्थात कोण हे ज्ञान प्राप्तीसाठी सजग आहे हे विचारायला येणार. ज्यांना ज्ञान प्राप्तीची इच्छा असेल त्यांना आज प्राप्त होणार.

आज आरोग्यदायी कोजागरी पौर्णिमा. शरद चांदण्यात देवीचे पूजन करून दुधाचा नैवेद्य अर्पण केला जाणार. आज ऐरावतावरील इंद्रदेवाचेही पूजन होणार. शेतकरी राजाची नवान्न पौर्णिमा. ते लक्ष्मी रुपात घरी आलेल्या नवधान्याचे पूजन करणार.

आज शरद ऋतूतील चंद्राची शुद्ध धवल किरणे मानवावर अमृताची बरसात करणार. ही किरणे धवल दुधात सामावून आल्हादी चांदण्यात सुकामेवा घातलेल्या दुधाचा.. खीरीचा आस्वाद घेतला जाणार. मानवी मन धवल करणारी ही पौर्णिमा. आज कुठे लक्ष्मीचे पूजन तर कुठे गरबा.. रासक्रिडा. विदर्भ.. मराठवाड्यात भुलोजी आणि भुलाबाई या शिव पार्वती रुपांना बाहुले म्हणून मांडून या शिवशक्तीचे पूजन होणार. “पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे, साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा..” या सारख्या अनेक लयबद्ध गाण्याला टिपऱ्यांच्या साथीने घरोघरी मैत्रिणीं फेर धरणार.

मग खिरापत ओळखण्याची गंमत, गाण्यातून व्यक्त होणारे नात्यातील रुसवे फुगवे.. तरीही पुन्हा एकी. विसरा अन् एकत्र रहा हे संसारमर्म बालपणीच शिकविणारी ही भुलाबाईची गाणी. हे आमचे पारंपारिक वैभव.

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

त्या चांदण्याने चंद्राला जणू वेढाच घातलाय. सभोवतालच्या चांदण्यामुळे तारे चमकत हसरे होतात. हे चांदणे म्हणजेच पृथ्वीने आकाशात ओंजळीतून उधळलेले मोतीच. हे सौंदर्यवती तू चालताना जणूकाही अशा मोत्यांचे शिंपण करीत आहेस असा भास होतोय.
ते तेजपुंज चांदणे म्हणजे आकाश गंगेने परिधान केलेल्या कटीवरच्या पदराचा मेखलाच. तुझ्या हृदयमंदिरी हा जीव गुंतलाय, तुझ्याच तालाच्या नादात आणि बोलावर तो चालणार आहे.


निलवर्णीय आकाशगंगा जशी मन मोहून घेते, तशीच तूझी काया आहे. कशाला स्वतःच्या कायेला झाकून ठेवतेस, आकाशातील मेघासारखे हे लोभस सौंदर्य तसेच बघू दे. तू अशीच ओंजळीतून चांदण्याचे मोती बरसत रहा..
चंद्र असो वा चांदणे याचे मानवी जीवनात भावनिक नाते. राजा बढे हेच आगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. पं. हृदयनाथ हे सुरेल भाव भारतीय वाद्य वापरुन प्रत्येक हृदयापर्यन्त पोहोचवतात. कोजागरी आली की पहिले आठवणारे गाणे हेच.

चांदणे शिंपीत जाशी,

चालता तू चंचले

ओंजळी उधळीत मोती,

हासरी ताराफूले

वाहती आकाशगंगा,

की कटीची मेखला

तेजपुंजाची झळाळी,

तार पदरा गुंफीले

गुंतविले जीव हे,

मंदीर ही पायी तुझ्या

जे तुझ्या तालावरी,

बोलावरी नादावले

गे निळावंती कशाला,

झाकिसी काया तुझी

पाहू दे मेघाविण

सौदर्य तुझे मोकळे

गीत : राजा बढे

संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वर : आशा भोसले

आनंदी पहाट | Happy dawn हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

आनंदी पहाट | Happy dawn – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share आनंदी पहाट | Happy dawn

You may also like

One thought on “आनंदी पहाट | Happy dawn

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO