Kitchen tips

किचन टिप्स | Kitchen Tips

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Kitchen Tips

१.दूध नेहमी मंद आचेवर गरम करावे,म्हणजे छान जाड साय येते.

२.विरजणाचे दही ताजेच असावे.

३.ज्या दिवशी लोणी काढले असेल त्या दिवशी न कढवता दुसऱ्या दिवशी कढवावे. तूप जास्त पडते.

४.लोणी कढवून झाल्यावर गॅसवरून कढई खाली उतरवून त्यावर झाकण ठेवावे. तूप चांगले होते.

५.तुपाचा डबा कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये, ठेवला तर तूप मेणचट होते.

६.खोबरे तुरीच्या डाळीत ठेवावे.

७.वरण भाताचा कुकर लावण्याच्या आधी डाळ, तांदूळ धुवून त्यात योग्य पाणी घालून तीस मिनिटे ठेवून, मग कुकर लावावा डाळ,तांदूळ छान शिजतात. कुकरमध्ये खाली पाण्यात लिंबाची फोड टाकावी. कुकर आतून स्वच्छ रहातो.

८.स्वयंपाक करायला सुरुवात करण्या अगोदर पाणी गरम करून घ्यावे. स्वयंपाक करताना आपण हे पाणी भाजी आमटीत टाकू शकतो.

९.भाकरीचे पीठ जुने झाले असेल तर भाकरी नीट थापली जात नाही , तेव्हा गरम पाण्याने भाकरीचे पीठ भिजवून मळावे भाकरी चांगली होते.

१०.फोडणी करून भाजी कढईत टाकली की गॅस बारीक करावा ,भाजी मंद आचेवर शिजू दयावी.

११.कोशिंबीरत दही वेळेवरच घालावे,नाहीतर कोशिंबिरीला पाणी सुटते.

१२. स्वयंपाक करताना बरेचदा आपण लिंबू वापरतो, लिंबू पिळून झाले की त्याची साल फेकू नये, एका स्वच्छ बरणीत ही साले जमा करावीत,थोडे मीठ टाकावे,असे प्रत्येक वेळी करावे बरणी भरली की दोन मोठी लिंबे त्यात पिळवी, साखर किंवा गूळ टाकावा , दोन छोटे चमचे तिखट टाकावे व सालिचे लोणचे तयार करावे. लिंबाचे इतर उपयोग.

किचन टिप्स | Kitchen tips – शेअर करा.

किचन टिप्स | Kitchen tips – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share किचन टिप्स | Kitchen tips

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock