पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Question
(बापाच्या दारूच्या व्यसनामुळे त्याच्या लहान मुलाच्या खुरटत चाललेल्या बालमनाचा हा कानोसा…)
परिक्षेत मुलं पास होतात
पालक त्यांचं कौतुक करतात
अव्वल नंबर काढून सुध्दा
पप्पा, माझीच नजर खाली का?
पप्पा त्यांचे वेंगेत घेतात
गोड गोड पपी देतात
माझंही मन आसुसलेलं
पप्पा, तुमचीच मला भिती का?
शेजार सगळा ऊजळलेला
आनंदच जणू ऊधळलेला
आपण देखिल त्यांच्याचसारखे
पप्पा, आपल्याच घरात अंधार का?
सगळ्या कशा नटून येतात
सण सोहळ्यात मिरवून घेतात
अंग चोरूनी ऊभी मम्मी
पप्पा, तिचीच मान खाली का?
नाचणं गाणं चालू असतं
सुखात सारं जग हसतं
कोपऱ्यात ऊभी ऊदास मम्मी
पप्पा, तिच्याच डोळ्यात पाणी कां?
पप्पा…..
कधीतरी मी शाळेमध्ये
ताठ मानेने चालेन का
मायेने तुमच्या गळ्याभोवती
हात चिमुकले टाकेन का
मम्मीच्या ऊदास ओठांवरती
हसू जरासं फुटेल का …
ग्लास तुमच्या हातांमधला
प्लीsssssssज पप्पा, सांगा कधी सुटेल का…
सांगा कधी सुटेल का…
-©ॲलेक्स मच्याडो
4 thoughts on “प्रश्न | Question”