पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
My Dear Cycle
तु असशील सोबत तर…
नाही लागणार ‘महागडे पेट्रोल’!
नाही अडवणार ‘नाक्यावरचे टोल’!
License ची नाही झंझट!
Green असो वा red…
Signal पार करता येईल झटपट!
माय डिअर सायकल….!
तुझे मोलच…अनमोल!
तु असशील सोबत…
अन् रोज तुझ्यासोबत मारली ‘फेरी’!
तर…गायब होईल ‘पोटाची ढेरी’!
माय डिअर सायकल….!
तुझे मोलच…अनमोल!
तु असशील सोबत तर…
छोडो यार…ट्रॅफिकची ‘कटकट’!
Pedal मारेन ‘सटासट’!
पोटऱ्या होतीलच दणकट!
शिवाय मांड्याही ‘बळकट’!
माय डिअर सायकल….!
तुझे मोलच…अनमोल!
तु असशील सोबत तर…
मजबूत होईल ‘मणका’!
नाही जाणवणार…
रस्त्यातल्या खड्ड्यांचा ‘दणका’!
माय डिअर सायकल….!
तुझे मोलच…अनमोल!
तु असशील सोबत तर…
भक्कम होतील ‘बाहू’…’खांदे’!
नाही होणार…
फ्रोझन शोल्डरचे ‘वांदे’!
माय डिअर सायकल….!
तुझे मोलच…अनमोल!
तु असशील सोबत तर…
उच्च रक्तदाब येईल ‘नियंत्रणात’!
उत्साह भरेल ‘तना मनात’!
माय डिअर सायकल….!
तुझे मोलच…अनमोल!
तु असशील सोबत तर…
टेकडीला ‘वळसा’ घालायची…
ठेवीन ‘जिगर’!
चवळीच्या शेंगेसारखी होईल ‘फिगर’!
जवळपासही फिरकणार नाही…
ती silent killer ‘शुगर’!
माय डिअर सायकल….!
तुझे मोलच…अनमोल!
तु असशील सोबत तर…
फुफ्फुसाची वाढेल ‘क्षमता’!
श्वासांची वाढेल ‘दिर्घ घनता’!
माय डिअर सायकल….!
तुझे मोलच…अनमोल!
तु असशील ‘सर्वांच्याच सोबत’ तर…
रोज होईल रपेट!
लागेल भूक भरपेट!
नाही ‘धूर’…No pollution !!!
थांबेल साऱ्या पर्यावरणाचे ‘शोषण’!
धरती होईल…’आरोग्य भूषण’!
माय डिअर सायकल….!
तुझे मोलच…अनमोल…
One thought on “माय डिअर सायकल…. | My Dear Cycle”