पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Negative thinking
परवाचीच गोष्ट. माझी नात आमच्याकडे पाहुण्या आलेल्या छोट्या मुलीला घेऊन आमच्या उंच स्टँड असलेल्या फिरत्या खुर्चीवर एकदम उडी मारून बसली . खुर्ची एकदम डळमळली व जोरात पुढे सरकली . मी नातीला म्हटलं , अगं! जपून बस. नाहीतर दोघीही पडाल. यावर नात म्हणाली, ” काय ग आजी, तू नेहमीच् असं निगेटिव्ह थिंकिंग काय करतेस? त्यामुळे मग खरंच तसं वाईट घडू करतं.” ” अग! तसं नाही. काळजी वाटली म्हणून म्हटलं. ” मगतो विषय तिथेच संपला. मन मात्र विचार करत राहिलं .
आजकाल हा शब्द नवीन पिढी च्या तोंडून बऱ्याच वेळा ऐकायला मिळतो . आमच्या वेळी अशी विचारसरणी होती की प्रत्येक वेळी , अमूक एका गोष्टीचा ,घटनेचा काय परिणाम होईल? चांगला की वाईट? त्याचा अधीच बारकाईने पूर्ण विचार करायचा . सावधगिरी बाळगून पुढचं पाऊल टाकायची. अशी मनाची धारणा होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या उक्तीप्रमाणे “विपरित तेच घडेल ” याची मनाची तयारी ठेवायची. त्यामुळे आपलं मन संकटाशी सामना करण्यासाठी तयार रहातं. अपेक्षा भंगाचा आघात पेलू शकतं. मनाला धक्का सहन करण्याची क्षमता येते.
आत्ताच्या पिढी मध्ये ही क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे तरूण, विद्यार्थी दशेतली मुलं लगेच डिप्रेशन मधे जातात . आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल उचलतात. कारण सतत पॉझिटिव्ह थिंकिंग …संकटाशी सामना करण्यासाठी लागणारी सहनशीलता त्यांच्या पाशी नसते. आपल्या मनाविरुद्ध ही घडू शकते हे स्वीकारण्याची शक्तीच त्यांच्या जवळ रहात नाही.
मला असं वाटतं की नकारात्मक विचार केल्यानं वाईटच घडतं ही समजूत बरोबर नाही. मात्र कोणाचा दवेष करणं. कोणाचं वाईट चिंतणं, वाईट बोलणं , याला मी निगेटिव्ह थिंकिंग असं म्हणू शकेन. ही मनोवृत्ती मात्र अनिष्ट, घातक आहे. माझ्या द्रुष्टीने हे निगेटिव्ह थिंकिंग आहे. मित्र मैत्रिणीनो , तुम्हालाही वाटतंय् का असं?
-©वंदना काळे
निगेटिव्ह थिंकिंग | Negative thinking हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
निगेटिव्ह थिंकिंग | Negative thinking – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
One thought on “निगेटिव्ह थिंकिंग | Negative thinking”