पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Pati | Board
काल कटिंग सलूनच्या दुकानावर
एक पाटी वाचली..
“आम्ही तुमच्या मनावरचे ओझे
कमी करू शकत नाही,
मात्र डोक्यावरचे ओझे
नक्कीच कमी करू “..🤣
इलेक्ट्रिकच्या दुकानवाल्याने
फलकावर लिहिलं होतं..
“तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो,
आमच्या बल्बचा नक्की पडणार”.. 🤣
इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं
वाचून माझं मन भरून आलं ..
“आपला कुणी फॅन नसेल तर
आमच्याकडून एक घेऊन जा “..
चहाच्या टपरीवर असाच फलक होता..
“मी साधा माणूस आहे पण
चहा मात्र खास बनवतो..”🤣
एका उपाहारगृहाच्या फलकावर
वेगळाच मजकूर होता ..
“इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही,
आपण बिनधास्त आत या..” 🤪
पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..
“पाणीपुरी खाण्यासाठी मन
मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं” ..🤣
फळं विकणाऱ्या माणसाने
तर कमालच केली. ..
“तुम्ही फक्त पैसे देण्याचे कर्म करा,
फळं आम्ही देऊ “.. 🤣
घड्याळाच्या दुकानदाराने अजब
मजकूर लिहिला होता ..
“पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा,
पाहिजे तर भिंतीवर टांगा
किंवा हातात बांधा..”🤣
ज्योतिषाने फलक लावला होता
आणि त्यावर लिहिलं होतं…..😅
“या आणि फक्त १०० रुपयांत आपल्या
आयुष्याचे पुढील एपिसोड बघा …”🤣
😂😀🤣
हसत रहा, हसवत रहा
🤪😁🤣🤪😁🤣🤪😁🤣😄
3 thoughts on “पाटी | Pati | Board”