Believe in yourself

स्वतःवर विश्वास ठेवा | Believe in Yourself

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Believe in yourself

कालपर्यंत ज्याचं नाव पण कोणाला माहिती नव्हतं आज त्याच्या बारीक सारीक गोष्टींना देखील कितीतरी महत्त्व प्राप्त झालंय…. हो अगदी तो कुठे शिकला… काय करायचा… त्याने कसा आणि किती किती संघर्ष केला…. 2019 ला त्याचा अपघात झालेला वगैरे वगैरे… !!

अर्थातच भाऊंनी भारताला जगातल्या कितीतरी भारी भारी प्रतिस्पर्धीना ऑलम्पिक मध्ये हरवून गोल्ड मेडल मिळवून दिलंय ….चर्चा, कौतुक, गौरव, सन्मान व्हायलाच पाहिजे… आणि सुदैवाने त्याच्या राज्य सरकारने त्याच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्याचा योग्य तो सन्मान केला देखील आहे… !!

माझ्या सारखे बरेच नव्हे लाखो करोडो लोकं त्याचं स्टेटस ठेवत असतील…. त्याचं नाव घेत असतील…. कौतुक करत असतील … करायलाच हवं …. पण पण पण …..

नेमकं इथे पण काहीतरी मला चूकचुकल्या सारखंच वाटतं……. !!

आपल्या इकडे जिंकणाऱ्याला इतकं महत्त्व दिलं जातं की हारणारा , अपयशी ठरलेला आपल्या दृष्टीने अगदी झिरोच ठरतो….

तुम्हीच विचार करून बघा बरं… कोणीतरी अयशस्वी झाल्यानंतर आपण केलय का कधी कौतूक त्यांचं ? त्याने जिंकण्यासाठी नसेल का केला कधीच प्रयत्न? की फक्त तो जिंकला नाही म्हणजे त्याची लायकीच नव्हती कधीच?? की मग फक्त तो जिंकला नाही म्हणूनच तो कौतुकासाठी पात्र नाही? फक्त मेडल मिळवणाराच सर्वश्रेष्ठ असतो का?? जिंकतो तोच भारी असतो का?? मग हारलेल्यांच काय हो??

स्पर्धा परीक्षा घ्या…. ऑलम्पिक घ्या…….. व्यवसाय घ्या….. कोणत्याही क्षेत्रात हो आयुष्याच्या ज्या ज्या क्षेत्रात भयंकर स्पर्धा आहे अशा कोणत्याही क्षेत्रात आपला समाज फक्त आणि फक्त जिंकणाऱ्यांना …. पहिला दुसरा तिसरा किंवा यशस्वी लोकांनाच महत्व देतो…… !!

नाण्याची दुसरी बाजू इतकी वाईट आहे की हारलेल्यांना कळत नकळतपणे आपण अगदीच शून्य बनवून टाकलेलं असतं….कमाल आहे ना? फक्त पदक मिळवता आलं नाही म्हणून ऑलम्पिक पर्यंत जाण्यासाठीचा संघर्ष पूर्णपणे शून्य होऊन जातो.

त्यांची मेहनत, त्यांचा संघर्ष, त्यांनी जागलेल्या रात्रींची , गाळलेल्या घामाची, पाहिलेल्या स्वप्नांची, घेतलेल्या भरारीची, केलेल्या प्रगतीची किंमत फक्त आणि फक्त कोणतं पदक , कोणतं पद , कोणतं यश न मिळाल्याने शून्य एकदम गोल गोल शून्य करून टाकण्यात येते….!

कोणालाच अगदी त्याला सोडून इतर कोणालाच हे कधीच लक्षात येत नाही की तो एव्हरेस्ट सर करण्या साठी फक्त काही फूट, काही पावलं, काही सेकंद, काही मार्क्स आणि कधी कधी तर थोड्याश्याच नशिबाच्या सोबतीने दूर होता….. नेमका शेवटच्या क्षणीच त्याचा तोल गेला, तो थकला, तो थांबला, तो संपला… त्याचा हात निसटला आणि तितक्या उंचीवरून नीट खाली…. रसातळाला गेला…!

उघडा डोळे…. बघा इकडे तिकडे नजर मारून, असेच तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील…. ज्यांनी अफाट कष्ट घेतले असतील…. भयंकर प्रयत्न केले असतील…. पण स्पर्धा परीक्षा असेल… व्यवसाय असेल…. आयुष्य असेल…. प्रेम असेल…. संसार असेल….. अथवा मग ऑलम्पिक असेल….. त्यात त्यांना हवं तसं यश मिळालं नसेल….पण फक्त यश आलं नाही म्हणून ते zero नाहीत होत राव….!!

खरे तर यशस्वी लोकांपेक्षा ते जास्ती भारी Hero आहेत…. कारण त्यांनाच तर आलेलं अपयश, अपकीर्ती पचवावी लागत असेल…. ज्या एव्हरेस्ट च्या उंचीवरून पडल्या नंतर भल्या भल्यांना नीट जिथे धड बसता येत नसतं तिथे परत यांना उठून चालावं लागत असेल…. काही जण तर परत त्याही पेक्षा मोठी उंची गाठण्याचं ध्येय ठरवत असतील आणि परत धावायलाही जात असतील…..

मग वेळ काढून करा अशाही अपयशी , अयशस्वी लोकांच कधी कौतुक … ठेवा अशा पण खूप संघर्ष , खूप प्रयत्न केलेल्या लोकांचं कधी Status…. वाटू द्या त्यांनाही थोडंस समाधान….. आणि वाटू द्या त्यांनाही कधी

त्यांची शून्या पेक्षा जास्ती जरा किंमत…..

बऱ्याच मित्र मैत्रिणींना आयुष्याच्या सर्वात वाईट काळात , Struggle Period मध्येच तुमची Support System म्हणून गरज असते…..!!!

माहिती का…. कौतुकांच्या हजारो शाबासकी देणाऱ्या हातांपेक्षा असा Struggle Period मध्ये एखादा सपोर्ट करणारा हात जास्ती महत्त्वाचा असतो…. आणि हो अर्थातच सगळं करून पण पदरी अपयश आल्यांनंतर पण जो हात सोबत देत असतो तो तर सपोर्ट करणाऱ्या हातांपेक्षा ही श्रेष्ठ असतो…!!

म्हणून आजपासून एक नक्की करा…. जितकं कौतुक एखाद्या जिंकणाऱ्याच कराल ना…. तितकंच नका पण थोडं तरी त्या यशासाठी मेहनत घेऊन पण अपयश आलेल्यांच नक्की करा…. आसपास असणारे अपयशी लोक शोधा…. त्यांच्यात कळत नकळत पणे लोकांच्या टोमण्यांनी न्यूनगंड तयार केलेला असतो…. चार शब्द त्यांना ही प्रेरणेचे देत चला … चार चौघात त्यांच्या सोबत आणि त्यांच्या मागेही थोडस त्यांच्या बद्दल गौरवोद्गार काढा…. तू जितकं केलंस ते ही जबरदस्तच होतं असं नक्की त्यांना सांगा…!

आणि चमत्कार बघा….. कदाचित तुमच्या या चार शब्दांनी ते बसलेले असतील तर उठून उभे राहतील…. उठून उभे राहत असतील तर चालायला लागतील….चालत असतील तर धावायला लागतील …. आणि नाहीच असं काही झालं तर निदान आत्महत्या करण्याचं तरी नक्की टाळतील…. !!

पटला विचार तर नक्की Forward किंवा share करा…. काय माहिती एक दिवस आपल्या इकडे ही जपान सारखी मानसिकता ठेऊन कोणतं तरी वृत्तपत्र बातमी देईल :-

Good Morning Athletes!! Even If you Don’t get a Medal, you’re still The BEST !!

Believe in Yourself…!!!

©सुकेश जानवलकर

स्वतःवर विश्वास ठेवा|Believe in yourself हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

स्वतःवर विश्वास ठेवा|Believe in yourself – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share स्वतःवर विश्वास ठेवा| Believe in yourself

You may also like

3 thoughts on “स्वतःवर विश्वास ठेवा | Believe in Yourself

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO