पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Point of View
तिच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरिता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्रखरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवर्याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता खाता नवरा तिला म्हणाला, ‘‘आज खरा आनंद येतोय. लहानपणापासून खरवड मला खूप आवडते. आम्ही त्याकरिता भांडायचो. पण, खरवड नेहमी तूच घ्यायची. तुलाही आवडत असल्यामुळे मी कधी मागितली नाही.’’बायकोच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो.
पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो… अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो… त्यावर माणसे ठाम असतात… खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते… विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे… म्हणजे मग तो विकसित होतो… जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात… ‘माणूस’ समजणे सोपे जाते…दृष्टिकोन म्हणजे नकाशा. तोच चुकीचा असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही… एकच ध्येयअसलेली माणसेही वेगवेगळ्या चुकीच्या ठिकाणी पोहोचतात, याचे कारण म्हणजे चुकीचे नकाशे…
अर्थात चुकीचे दृष्टिकोन… . म्हणूनच ‘नजर बदलेगी, तो नजारें बदलेंगे’.!!!
दृष्टिकोन | Point of View हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
दृष्टिकोन | Point of View – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
2 thoughts on “दृष्टिकोन | Point of View”