पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
पाऊस वाजतो दारी
काय चुकलं , किती चुकलं
कोण भिजलं, कोण सुकलं
पुलाखालचं पाणी सुद्धा वाहून वाहून वाहून थकलं..
पाणीच काय, पूल सुध्दा वाहून गेला आहे
पाणीच काय, पूल सुध्दा वाहून गेला आहे
एक पाऊस माझ्याकडे राहून गेला आहे..
पाऊस वाजतो दारी
हलकेच निथळती सूर
हलकेच निथळती सूर
मी आत उंबऱ्याआड
मैफलीत असुनी दूर
मैफलीत असुनी दूर
एक पाऊस माझ्या कडे राहून गेला आहे
एक पाऊस माझ्या कडे राहून गेला आहे
श्वासांच्या सतारीत मल्हार ठेवून गेला आहे
पाऊस छेडतो ताना
पाऊस छेडतो ताना
वाऱ्याची घेऊनी साथ
वाऱ्याची घेऊनी साथ
भिनलेला ताल धराया
थरथरती दुबळे हात
थरथरती दुबळे हात
पाऊस वाजतो दारी
हलकेच निथळती सूर
पाऊस मोकळा होतो
जणू जन्म भोगूनी साथी
जणू जन्म भोगूनी साथी
मी नाव कोरतो माझे
अश्वत्थाम्याच्या माथी
अश्वत्थाम्याच्या माथी
पाऊस वाजतो दारी
हलकेच निथळती सूर
हलकेच निथळती सूर…
स्वर – राहुल देशपांडे
गीत – वैभव जोशी
काव्य वाचन – वैभव जोशी
संगीत – अमोद कुलकर्णी
2 thoughts on “पाऊसगाणी | Pausgaani Kavita”