पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Popati
हा कुठला पदार्थ आणि हे कुठलं नाव 🤔अस बऱ्याच जणांना वाटेल 😃
आमच्या रायगड जिल्ह्यात जानेवारी,फेब्रुवारीमधे ह्या “पोपटी”पार्ट्या जोरदार असतात(जशी हुरडा पार्टी असते) थंडीच्या दिवसात हिरव्यागार वालाच्या शेंगा यायला लागल्या की “पोपटी पार्टी” ची सुरवात होते.
मोठ्या मातीच्या मडक्यात खाली भांबुर्डी चा पाला(अगदि रस्त्याच्या कडेला ही मिळणारी एक वनस्पती) आणि त्यावर तिखट मीठ,ओवा आणि मसाला लावलेल्या वालाच्या शेंगा,मटारच्या शेंगा,शेंगदाणे मसाला भरलेले कांदे,बटाटे,वांगी,रताळी असा थर देत मधे मधे भांबुर्डीचा पाला घालुन शेवटी त्याच पाल्याने मडक्याच तोंड बंद करुन खाली वर आगीत हे मडक भाजल जात काही वेळातच इतका अप्रतिम घमघमाट सुटतो विचारूच नका 😃
कधी एकदा ते मडकं समोर येतय आणि त्यातल्या पोपटीवर ताव मारतोय अस होऊन जात 😋हा जो भांबुर्डीचा पाला वापरतात ह्याला ही छान सुवास असतो त्यात बाकीच्या भाजल्या गेलेल्या पदार्थांचा वास मिसळला कि “क्या बात..” अस तोंडातून आल्या शिवाय रहात नाही 😃मित्रमैत्रिणी,सगे सोयरे ह्यांच्या बरोबर ह्याचा आस्वाद घेण्यात औरच मजा असते.
तर अशी ही “पोपटी” गेले दोन वर्षे मी कुकरमध्ये ही करते, प्रोसेस सगळी तीच जी मडक्यात लावताना करतात पाणी अजिबात न घालता खाली वर भरपूर पाला घालुन 30/40मिनिटात ‘पोपटी’ तयार होते.केळीची पान हाताशी असली की मी पनीर मँरिनेट करुन केळीच्या पानात बांधुन त्यात घालते.आहाहा.. काय स्वाद असतो त्या पनीर चा लाजवाब 😋 ह्यावेळी केळीची पान नव्हती त्यामुळे पनीर नाही घातल पण मग शेंगदाणे आणि सोललेले मटारचे दाणे वाटीत घालून ते आत ठेवले एरवी तेही केळीच्या पानात बांधुन ठेवते. *नॉनव्हेज खाणारे ह्यात चिकन आणि अंडी घालतात 😃 तर अशी ही ‘पोपटी’😃
आमची “पोपटी पार्टी” होईलच मित्रमैत्रिणीं बरोबर कमीत कमी तीन वेळा 😅 पण म्हटल तो पर्यंत दुधाची तहान ताकावर भागवायची😅 *अर्थात कुकरमध्ये ही मस्तच होते ही पोपटी.
-©सौ. प्राची शरद जोशी
पोपटी|Popati हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
पोपटी|Popati – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.