Proud Peacock

गर्विष्ठ मोर | Proud Peacock

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Proud Peacock

एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.

मोर म्हणायचा, “माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.

एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, “किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत.”

करकोचा म्हणाला, “मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. “एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. 

Moral of the Story (Proud Peacock)

बोध

दिसण्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची आहे.

YouTube Video: Proud Peacock

अकबर बिरबल कथा

Share

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock