पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
The Peasants Struggle
नदीवर तसेच गंगावेश मध्ये खेड्यातून आलेल्या भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असते.रान भाज्या , अस्सल मराठी भाज्या, रानमेवा घ्यावा तर फक्त त्यांच्या कडेच.
नव्या सरकारी नियमानुसार सकाळी 7 ते 11 भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू मिळणार असा आदेश असल्याने सकाळी साडे दहा वाजता नदीवरील मंडईत पोचलो ..बाकी दिवशी ही वेळ म्हणजे पीक अवर्स पण सध्या क्लोजिंग टाईम त्यामुळं झटपट जे असेल ते उचलू असा उद्देश घेऊन मंडईत शिरलो सोबत पाचशे ची नोट व दहा वीस रुपयांच्या तीन चार नोटा व पंधरा एक रुपयाची चिल्लर होती ..
विचार केला होता की सुट्टे पैसे पुरणार नाहीत म्हणून प्रथम बागवानाकडे किंवा फळ वाल्याकडे एखादी मोठी खरेदी करून पाचशे सुट्टे करून व मग भाज्या घेऊ ..पण मंडईत चित्र हे अगदी विचित्र होते.आयुष्याच्या खस्ता काय असतात ते पाहायला मिळाले..सध्या सर्व बाजार डॉट अकराला बंद करयाचा असल्याने तिथं एक अजब अस्वस्थता जाणवली, आर्त हाका देणारे खेडूत शेतकरी बाया बाप्पई आणि त्यांचे मातीमोल झालेले भाव पाहून दुःखाला लिमिट राहिले नाही..
पाऊण एक किलो भेंडी वीस रुपये, मोठी कोथिंबीर पेंडी पाच रुपये , टोमॅटो दहा रुपये किलो , अस्सल कोल्हापूरी छोट्या काकड्या (वाळक) तीस रुपये किलो, कार्ली वीस रुपये किलो, कोबी पाच रुपये, वांगी वीस रुपये किलो इतका कमी भाव ह्यांना कसा काय परवडतो हे शंभर वेळा विचार केला तरी कळत नाहै.
हे सर्व घेतो पाहतो तोवर पावणे अकरा झाले आणि प्रांम्ट महानगरपालिका तिथं पोचली व फक्त पंधरा मिनिटं राहिली आहेत , वेळेत आटपा नाहीतर अशी धमकी वजा सूचना देऊ लागले आणि त्या खेडुतांचा उरलासुरला जीव व भाजीचा भाव मेटाकुटीला आला आणि त्या विनवू लागल्या : साहेब जे द्यायचे ते द्या पण घेऊन जावा आमचा टेम्पो आलाय आमी आमच्या घरला जातो. 😓😓
पुढे येऊन त्या टेम्पो वाल्याला म्हटलं की तुला जरा थांबायला काय होते त्यावर तो म्हणतो साहेब मी दिवसभर थांबलो असतो पण पोलीस एवढी मोठी फाडत्यात की मिळालेले सगळे पैसे खलास होत्यात.जे पीकवतात आणि आम्हाला जगावतात त्यांची हि अशी अवस्था पाहून खूप अस्वस्थ व्हायले झाले आणि आपण काही करू शकत नाही याचे दुःख..
स्टोरी अजून संपली नव्हती.घरी येताना सोन्या मारुती चौकाजवळ एका दुकानाच्या दारात फेटा बांधलेला मामा दिसला , त्याच्या कडे ओल्या शेंगा होत्या. चौकशी केल्यावर कळले की तो मामा नुकताच शहरात आला होता पण अकाराला बंद होत असल्याने घाबरून पुन्हा बस स्टँड कडे चालला होता , चालून दमला म्हणून दुकानाच्या दारात बसला होता , पावशेर शेंगा द्या म्हटल्यावर त्याने तागडं नाही म्हणत ओंजळीने शेंगा पिशवीत घातल्या तेही चेहऱ्यावर हसू आणत..
स्टोरी अजून संपली नाही.पुढे पर्ल हॉटेल पासून सदर बाजार रस्त्यावर ताराबाई पार्क कडे जाताना एक खेडूत मावशी रस्ताच्या ह्या बाजूने त्या बाजूला जातांना दिसली, डोक्यावर बुट्टी..आता साडे अकरा वाजता हि कुठं चालली असेल ह्या कुतूहल पोटी थांबून विचारले. ती म्हणाली साहेब बारकी देशी जाभंळ हाईत.. मी म्हणालो अहो अकराला सगळं बंद होते की ..मावशी म्हणाली मला माहिती नव्हतं मी बाजार भोगाव वरनं निघाले आणि मग समजले.. विद्येविना मती गेली , मती विना गती हे दिडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले का म्हणाले याचं ते लाईव्ह उदाहरण होते..
काय हे संकट आणि संकटाला सामना करतांना करावे लागलेले हे लॉकडाउन, अन्न पिकवत्या खेडुताला (Peasants) आणि किती खस्त्या खायाला लावणार आहे कुणास ठाऊक 😓
ज्यांनी लेख शेवट वाचला त्याना विनंती 🙏🏼 ग्रामीण भागांतून ,खेडुतांच्या (Peasants) भाज्याला घासाघीस करू नका, काय होईल महिनाभरात लै लै शंभर रुपये भाजी पोटी जास्त द्याल पण त्यांना एक अप्रत्यक्ष मदत होईल शेवटी ती लांबून किंवा जवळून आपलीच भावकी आहे.. 🙏🏼🙏🏼🙏🏼
–©️ सुधर्म वाझे
खेडुतांच्या खस्त्या | The Peasants Struggle हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
खेडुतांच्या खस्त्या | The Peasants Struggle – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
One thought on “खेडुतांच्या खस्त्या | The Peasants Struggle”