पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
एक सत्यघटना
अमेरिकेत घड़लेली आणि पॅरानॉर्मल एक्टिविटी शी सम्भन्धित अत्यंत गाजलेली केस The Devil Made Me Do It.
मित्रांनो,
तुम्ही हॉरर मूवीज चे चहेते असाल तर तुम्हाला माहिती असेल की द कंज्यूरिंग यूनिवर्स ची अपकमिंग फिल्म द कंज्यूरिंग 3 लवकरच प्रदर्शित होत आहे.यात द कंज्यूरिंग यूनिवर्स चे मेकर्स नेहमी अमानवीय शक्तिशी रिलेटेड खऱ्या घड़लेल्या घटनांवर फ़िल्म बनवत असतात,अश्याच एका रीअल इंसिडेंट वर बेस असलेली मूवी येत आहे जि The Devil Made Me Do It.या नावाने ओळखली जाते.
सदर सत्यघटना 1980 साली अमेरिकेच्या ब्रूकफील्ड मधील कनेक्टिकट शहरातील आहे.ही कहाणी आहे glatzhel (ग्लाटझेल) परिवाराची.,कार्ल & जुड़ी ग्लाटझेल त्यांची दोन मूल,मुलगी डेबी आणि 11 वर्षाचा मुलगा डेविड ग्लाटझेल अस हे चौकोनी कुटुंब.ग्लाटझेल कुटुंब कनेक्टिकट शहरात नवीन घेतलेल्या टूमदार घरात शिफ्ट झाले होते.
पहीला दिवस घराची साफसफाई करण्यासाठी लवकर येतात आणि सर्व जण साफसफाई करत असतात,परंतु त्यांचा 11 वर्षाचा मुलगा डेविड त्याच्या रूम ची साफसफाई करत असताना त्याला एका विचित्र आणि भयानक दिसणाऱ्या म्हाताऱ्या माणसाची आत्मा दिसते,लागलीच डेविड ओरडत बाहेर येतो आणि घरच्यांना सांगतो पण घरचे त्याच्या कड़े तो लाहान असल्याने त्याचा बालिश व खोडकर पणा म्हणून दुर्लक्ष करतात.
डेविड ने पाहिलेला तो म्हातारा फक्त डेविड लाच दिसत असल्याने घरचे त्याला साफसफाई करायचा कंटाळा आला असेल म्हणून बहाने करत असावा बोलून शांत बसायला सांगून आवाराआवर करत घर नीट लावत असतात.पाहीला दिवस आणि तो घड़लेला प्रसंग याने डेविड पुरता घाबरुन गेलेला असतो.डेविड त्याच्या बहिणीला ही खूप कन्वेंस करायचा प्रयत्न करतो पण कोणीच त्याच्या कड़े लक्ष्य देत नाही.
रात्रि डेविड झोपल्यानन्तर कसल्याशा आवाजाने जागा होतो अन समोर पहातो तर तिथे एक कोपर्यात तोच म्हातारा एकटक डेविड कड़े पहात बसलेला दिसतो. डेविड पुन्हा किंचाळतो त्याच्या आवाजाने सगळे धावत त्याच्या रूम मधे येतात. डेविड पुन्हा त्यांना त्या म्हाताऱ्या विषयी सांगतो,पण तिथे त्यांना कोणच दिसत नाही पुन्हा सर्व डेविड वर ओरडतात आणि निमुट पणे झोपायला सांगतात.डेविड ति रात्र जागुन काढतो पण घरचे झोपायला गेल्यावर तो म्हाताऱ्याचा आत्मा पुन्हा त्याला समोर खुर्चीवर बसलेला व दात काढून राक्षसी हास्य करत “मि तुला मारून टाकणार् आणि आमच्या दुनियेत घेऊन जाणार’अस सांगून एकाएक अदृश्य होतो.
डेविडला दिवसेंदिवस तो आत्मा छळत होता रोज रात्रि त्याच्या बिछान्या समोर बसून तुला आमच्या दुनियेत घेऊन जाणार बोलून अदृश्य होत होता. आता तो आत्मा डेविड वर हावी झाला होता रोज त्याच्या अंगावर नखाने ओरबाडल्याच्या दाताने चावल्याच्या खुणा उमटत होत्या.पण घरातील कोणीही या कड़े फारस सिरियसली घेत नव्हतं.आता तो आत्मा डेविड ला भर दिवसा दिसून त्रास देत होता.
एक दिवस सकाळी सगळे ब्रेकफास्ट करत असता तिथे डेविड आला आणि त्या म्हाताऱ्या च्या आत्म्या बद्दल सांगू लागला असता, त्याचे आई वडील आणि मोठी बहीण त्याच्यावर ओरडले आणि त्याच्या कड़े प्रूफ मागु लागले असता,अचानक डाइनिंग टेबल वरील डिश,चमचे,ग्लास एकाएकी वाइब्रेट होऊ लागले ते डाइनिंग टेबल ही धड़धड़ करत जोरात हालू लागले हा अचानक घड़लेला प्रकार बघून त्यांना डेविड जे सांगतोय त्यावर विश्वास बसू लागला.
त्यांनी आधी डॉक्टर ला दाखवले पण काही फरक पडला नाही.चर्च च्या प्रिस्ट ला बोलवण्यात आल पण त्याचा ही काही उपयोग झाला नाही,डेविड हळू हळू एकांतात राहु लागला रोज रात्रि तो एखाद्या जनावराच्या आवाजात किंचाळत असे आणि विविध भाषां मधे बोलत असे…डेविड ची हालत गम्भीर होत होती शेवटी ग्लेटज़ेल फॅमिली ने जास्त वेळ न दवडता पैरानॉर्मल इंवेस्टिगेटर्स एड & लॉरेन वॉरेन यांना कॉन्टैक्ट करून सदर हकीकत सांगितली.
पैरानॉर्मल इंवेस्टिगेटर्सएड & लॉरेन वॉरेन यांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेतली.डेविड ला पहाताच त्यांना त्याच्या भवती एक काळी दाट सावली डेविड ला घट्ट पकडून असलेली दिसली.एड & लॉरेन वॉरेन यांनी एक्सकॉरसिजम ची प्रक्रिया करावी लागेल म्हणून संगीतल.आणि त्या दृष्टीने तयारी सुरु करण्यात आली . आता डेविड ला त्या म्हाताऱ्या च्या आत्म्या सोबत अजून आत्मे दिसू लागले ते सर्व त्याला त्रास देउ लागले होते.
एक्सकॉरसिजम करताना डेविड अचानक हवेत तरंगत, तर कधी पैरानॉर्मल इंवेस्टिगेटर्स वर झपकन फेकला जात असे.आता इथे एक मोठी चूक होते…या घटनेचा महत्वाचा व्यक्ति आर्ने जॉनसन कडून….ही एक्सकॉरसिसम ची प्रक्रिया पाहण्यासाठी डेविड ची मोठी बहिण डेबी आपल्या बॉयफ्रेंड ला सोबत म्हणून बोलवते.
डेविड वर ऐकूण एक्सकॉरसिजम च्या तीन वेळा प्रक्रिया केल्या जातात त्याच्या शरीरातून तब्बल त्रेचाळीस आत्मे मुक्त केले जातात डेविड त्या सर्वांची नावे ही सांगतो.पण ही प्रक्रिया करत असताना डेविड ला होणारा त्रास पाहून तिथे उपस्थित असलेला आर्ने जॉनसन रागारागात त्या सर्व आत्म्याना उद्धेशून इतकच म्हणतो की, “तुम्ही आत्मे कमजोर आहात म्हणून या लहान मुलाला त्रास देताय,जर तुमच्यात खरच दम असेल तर मला त्रास देऊन बघा….बस तो दिवस संपतो डेविड 43 आत्म्यानच्या त्रासातून मुक्त होतो पण थोड्याच दिवसात डेविड च्या बाबतीत जे प्रकार घडत होते सेम तेच प्रकार आता आर्ने च्या बाबतीत घडायला सुरुवात होते.
तोच म्हातारा आता आर्ने ला दिसत होता दिवसाढवळ्या अचानक अमानवीय गोष्टी त्याच्या सोबत घडू लागल्या,आर्ने जॉनसन ला ही एका पेक्षा जास्त आत्मे दिसू लागले होते आणि ते सर्व आर्नेला,तुला मारून आमच्या दुनियेत घेऊन जाणार सांगू लागले…..एक दिवस आर्ने कामावर जाण्यासाठी कार मधे बसला असता अचानक कार सुरु होऊन कार चा भयानक अपघात होतो पण आर्ने त्यातून वाचतो पुढे पुढे ते सर्व आत्मे आर्नेला आपल्या वश मधे करतात.आर्ने हळू हळू चिड़चिड़ा होतो स्वतःशी च इतर अनेक भाषेत बोलू लागतो.
एक दिवस आर्ने आपल्या घर मालका सोबत एका बार मधे घर मालकाच्या आग्रहास्तव ड्रिंक करत असता एकदम पॅनिक होतो आणि जवळच असलेल्या सूर्याने त्याला भोसकतो.आरनेचे हावभाव विचित्र होत जातात ट्रांस अवस्थे मधे आर्ने तसाच जंगलात जातो.पोलिस त्याला शोधून काढतात त्याच्यावर मर्डर केस होते, ही केस कोर्टात जाते.जेव्हा न्यायाधीश त्याला विचारतात की तू आपल्याच घर मालकाचा खून का केलास?तेव्हा आर्ने एकच वाक्य बोलत असतो ते म्हणजे ‘डेविल मेड मि डू इट’……….अर्थात हा खून मि नाही एका शैतानाने माझ्याकडून करवून घेतला आहे.
एक्सकॉरसिजम मधे सर्वाना त्याच्यात असलेल्या अमानवीय शक्तिचा आभास झाला होता वकीलां सहीत सगळे जाणुन होते की आर्ने खर बोलतोय परंतु कोर्ट अश्या गोष्टीनवर विश्वास ठेवत नाही आणि पुराव्या अभावि आर्नेला 20 वर्षाची शिक्षा होते.त्याच्या कडून झालेली एक चूक त्याला महागात पड़ते.पैरानॉर्मल इंवेस्टिगेटर्स एड & लॉरेन वॉरेन यांच्या एक्सकॉरसिसम मधील आणि अमेरिकेच्या मर्डर मिस्ट्री कोर्ट कचेरीतील सगळ्यात फेमस केस म्हणून प्रसिद्ध आहे. “The Devil made me Do It”
–©️प्रथम वाडकर
द डेविल मेड मी डू इट – The Devil Made Me Do It ही कथा आवडली असल्यास शेअर करा.
द डेविल मेड मी डू इट – The Devil Made Me Do It – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
3 thoughts on “द डेविल मेड मी डू इट | The Devil Made Me Do It”