पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Binding factor
“करंजी च्या सारणात थोडी कणिक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो.” लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची. पण कणिकच का? तांदळाचे पीठ का नाही? तर त्यावर ” अग गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. ” “मग आपण खव्याच्या किंवा मटार च्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ? माझा अजून एक आगाऊ प्रश्न तर त्यावर ” अग मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते ” तितकेच शांत पण तत्पर उत्तर.
अगदी सहजपणे माझ्या आईने जीवनातल्या दोन गोष्टी मला समाजवल्या
1)अंगी ओलावा असेल तर गोष्टी मिळून येतात.
2 ) ओलावा कमी असेल तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.
नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding factor चे महत्व पटत गेले.
आणि आज दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली.
नात्यांचंही असच आहे. प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो , जो सर्वाना धरून ठेवतो.
मग ते एखादे असे मित्र/ मैत्रीण असतील जे बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणतात व्हाट्सअप्प ग्रुप बनवतात आणि ” contact मध्ये रहायचं ह” अशी प्रेमळ दमदाटी ही करतात कधीकधी असा binding factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते.
आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factor दिसतात. आपण त्याना अनेकदा भेटलेलोही नसतो…. पण ते मात्र आपली चौकशी करतात… काळजीही करतात.
आशा सगळ्या binding factors ना माझा मानाचा मुजरा ते आहेत म्हणून समाजातील माणूसपण टिकून आहे अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही
मंडळी, आपण मोठे झालो, मिळवते झालो , चला तर आता मिळवून आणणारे होऊ या.
बंधनकारक घटक हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
बंधनकारक घटक – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
2 thoughts on “बंधनकारक घटक | Binding factor”