love romantic mind

मन ♥️♥️♥️ Mind

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Mind

मना मनाची मनामधूनी मनात आठवण झाली…
या मनांच्या खेळामध्ये मने किती विखुरली…

मनातच मग माझ्या मनाचा ताबा कसा हा सुटला…
विचार मना तू स्वतः लाच रे हा अंकुर कसा हा फुटला…

मनमंदिर हे अतीव सुंदर देव त्यात वसे मनाचा…
त्या देवाहून कितीतरी सुंदर वास यात प्रेमाचा…

कल्पना करवी, क्षणात भुर्र उडवी नेई ठाई ठाई…
कल्लोळ करुनी मग आठवण “स्व” ची करुनी देई…

क्षणात नेई आकाशात तर क्षणात ‘भू’ वरी आदळी…
“मी” पणा व “माझ्याचसाठी” यांचा क्षणात विस्तव होई…

या देहावर प्रेम अतिशय करणे ठाऊक त्यासी…
म्हणुनी सजते या देहाची काया नववधू परी…

देवाचे हे रूप समजुनी पवित्र त्यासी राखावे…
प्रत्येक देहापरी प्रेम या मनी सदा विलसत राहावे…♥️

-©अक्षय गोवारकर

Share Kavita

You may also like

9 thoughts on “मन ♥️♥️♥️ Mind

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO