Forfeit

शिक्षा | Forfeit | Penalty | Sentence

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Forfeit | Penalty | Sentence

लग्न माझे तिशीत झाले नवरा माझा नऊ वर्षांनी मोठा होता, दोघेही एकाच बँकेत काम करत होतो तिथेच ओळख झाली होती.कधी फार कोणाशी बोलत नसत ते किंवा फार कोणाच्यात मिसळत नसत पण कामात पक्के होते .calculation आणि accounts मध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते.. कोणा तरी मध्यास्था मार्फत त्यांनी मला मागणी घातली..एकुलते एक आई वडील अतिशय सज्जन आणि कायमस्वरूपी नोकरी.त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.

पण लग्ना नंतर माझ्या लक्षात आले की त्यांना दुसऱ्या बद्दल अजीबात आदर नाही आहे .प्रथम प्रथम मीही खूप त्रागा करायची भांडण वादावादी …पण नंतर लक्षात आले त्यामुळे घरातले वातावरण बिघडत चालले आहे ..सासूबाई सासरे कान कोंडे व्ह्यायचे..मग मी ह्यांच्याशी बोलणे सोडून दिले म्हणजे कामा पुरते व्हायचे पण तेवढेच.त्यामुळे ते आणखीन चढले आणि त्याचा उर्मट पणा वाढत चालला होता.

लग्नानंतर चार वर्षांनी मला दिवस गेले,आणि माझे मन अगदी मोहोरून गेले.सासू बाई बाबा सगळे खूप खूश होते.मनात एक आशा निर्माण झाली की मुलाच्या जन्मा नंतर हे सुधारतील .आमचे नाते परत चांगले होईल..मैत्रीणी ,माहेरी ,सासरी सगळीकडे अगदी दणक्यात माझे डोहाळजेवण झाले. तब्येत सुध्धा चांगली होती.सांगितलेल्या वेळी मला मुलगा झाला..तब्येतीचे व्यवस्थित , नाकी डोळी नीटस गहू वर्णी त्याला बघून माझे सगळे श्रम सार्थकी लागल्यासारख झाले मला. हेही खूश दिसत होते कदाचित मुलगाच हवा हा हव्यास पूर्ण झाला म्हणूनही असेल….(का बरं माझे मन अजूनही त्यांच्या बाजूने कौल देत नाही आहे..कसली एक हुरुहुर लागून राहिली आहे काही कळत नाही) मनाला दमटून गप्प करीत मी घरी आले.

बाळंत पण छान झाले मुलानेही त्रास दिला नाही फार त्यामुळे दोन महिन्यातच मी कामाला जायला लागले होते. बाळ माझे हुशार होते अभ्यासात बोलण्यात खेळण्यात…अगदी सगळ्यात .तो तिसरीत असताना मी त्याला मल्लखांब ह्या खेळात सहभागी व्हावे म्हणून क्लास लावले.तिथेही त्याने आपल्या हुशारीने स्पर्धेत भाग घेऊन खूप मेडल आणली.अशीच एकदा पुण्यात त्याची स्पर्धा चालू होती..काय झाले कळले नाही पण तो वरून पाय सुटून एकदम पाठीवर खाली आदळला..दोन मिनिटे कोणाला काही कळलेच नाही..जेव्हा लक्षात आले तेव्हा जीवाच्या आकांताने मी त्याच्या कडे धावत सुटले…..”डॉक्टर डॉक्टरांना बोलवा पटकन..कुणीतरी ambulance बोलवा…मदत करा मला ….लवकर या …माझा धावा हॉस्पिटल मध्ये जाई पर्यंत चालू होता.पंधरा तासाच्या अथक प्रयत्नाने माझे बाळ शुद्धीवर आले. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले

“I am sorry” ,”अहो डॉक्टर काय म्हणताय??? मी बघते आहे त्याला तो शुद्धीवर आलाय डोळे उघडले आहेत त्याने , सॉरी का म्हणताय?” “तुम्ही जरा बसा ..मी काय सांगतो आहे ते ऐका ..तुमचा मुलगा इतक्या उंचावरून पाठीवर पडला आहे त्याचा मणका खूप दुखावला गेला आहे ..त्याला कसल्याही जाणीव राहिल्या नाही आहेत चालू फिरू हसू रडू किंवा हलू सुद्धा तो शकणार नाही आहे.आता फक्त त्याचे वय वाढेल बाकी काही नाही.”

कसलातरी मागे आवाज आला म्हणून मी मागे वळून बघितले तर माझा नवरा मला सोडून घरी निघून चालला होता मागे वळूनही ना बघता.मुलगा हा असा झालेला आणि नवरा तो तसा …तुमच्याशी खोटे नाही बोलणार पण एकदा मनात विचार आला .गेला असता तर आयुष्यभर त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले असते .पण आता त्याला असे अचेतन कसे बघायचे…लगेचच स्वतःला सावरले.एक महिना हॉस्पिटल मध्ये काढून मी मुलाला घेऊन घरी आले.नोकरी चांगली असल्यामुळे बिलाची चिंता मला नव्हती.आणि नवऱ्याने परत हॉस्पिटल चे तोंड बघितले नव्हते.

घरी आल्यावर माझा दिनक्रम ठरला सकाळी चार ला उठून बाळाचे सगळे करून झाल्यावर त्याला थोडे भरवायचे आई बाबांना जेवण करून ठेवायचे आणि साडे नऊ च्या ठोक्याला घर सोडायचे ..साडेसहा ला घरी आल्यावर परत तेच.गेल्या दहा वर्षात माझ्या ह्या दिनक्रमात काडीचाही बदल झाला नव्हता.पण गेल्या वर्षी अगदी साधे निमित्त होऊन आई आणि बाबा सहा महिन्याच्या अंतराने गेले.आणि मी अनाथ झाले..पुढचे भविष्य मला इतके अंधारात दिसत होते की काही सुचत नव्हते.

शेजारणी ने एक पन्नाशी ची बाई मला आणून दिली .खूप प्रेमळ होती कामसू होती.आणि मुख्य म्हणजे तिला कामाची गरज होती.रोज सकाळी ती नऊ ला हजार व्हायची.बाळाला मालिश करायची अंघोळ घालायची भरवायची..आणि मग मी आले की जायची.खूप वर्षांनी मला जरा श्वास घ्यायला मिळत होता.

आणि आज माझ्या बाळाचा अठरावा वाढदिवस होता म्हणून मी त्याला सकाळीच विश करून चॉकलेट चा एक तुकडा भरवला होता बाकीचा फ्रिज मध्ये ठेवून दिले.अशी किती चॉकलेट्स फ्रिज मध्ये पडली होती त्याचा मी हिशोब करणेच सोडून दिले होते.हसू नका आई आहे मी त्याला कळत नसले तरी मला माहित होते ना त्याचा वाढदिवस.असो..शेवटी आईचे मन..

ऑफिसला निघाले तर नवरा म्हणाला मला जरा बरे वाटत नाही आहे त्यामुळे मी ऑफिस ला जाणार नाही आहे..एक क्षण वाटले विचारावे पण मनाने चक्क नकार दिला .म्हणाला फार आगाऊ पणा करू नकोस चल ….आणि मनाचे ऐकून मागे वळूनही ना बघता मी बँकेत निघाले .बऱ्याच वर्षांनी नवरा नाही त्यामुळे जरा मोकळी झाले होते.एकत्र मैत्रिणीबरोबर डबा खाल्ला जरा हसलो आणि तेवढ्यात फोन वाजला…भोवळ आल्याने मी पडले एवढेच मला आठवत होते.

मला घरी कोणी आणले कसे आणले..मला काही माहित नाही.घरामध्ये चार माणसे जमा झाली होती पोलिस आले होते.काय झाले …कसे झाले ओरडत मी घरात आले.जमिनीवर माझे बाळ निश्चेष्ट पडले होते.. बाळा….असे ओरडत मी त्याच्या अंगावर पडले त्याला हाका मारत राहिले.पण जिवंत असताना ज्याला माझा स्पर्श कळतं नव्हता त्याला आता काय कळणार ..मुश्किलीने मला माझ्या मैत्रीणीने बाजूला केले मला आत नेले.नवऱ्याने डॉक्टरांना सांगून मला झोपेचे इंजेक्शन दिले…….

जेव्हा मला जाग आली तेव्हा घर शांत झाले होते नवऱ्याला परत परत मी विचारात राहिले मी की कसा अपघात झाला ..तो एकटा कसा बाहेर गेला . दुसऱ्या दिवशी मावशी आल्या ,आल्या ताशा पायावर पडल्या आणि म्हणाल्या माझ्या मुळे झाले हे सगळे मला माफ करा…मला गावाहून फोन आला सासरे आजारी झाले आहेत.साहेब म्हणले मी आहे घरात जा तुम्ही..गावाला पोहोचले तर सासरे चांगले होते कोण मुडद्याने फसवले काय माहित.

पण मग सगळे म्हणायला लागले की आलीस तर रहा एक दिवस म्हणून आज आले ..मी असते तर असे झाले नसते….तिच्या गद गदनाऱ्या शरीराला मी उचलले आणि म्हंटले पण मावशी तो चालत होता खरंच ..मला कसे नाही कळले…. नाय ग बाय कसा चालणार तो,नाही म्हणजे तुम्ही मालिश करता होता ना …मग….अग बाय माजे ते आपले समाधान…तू सावर स्वतःला ,तेवढ्यात हे आत आले आणि माझ्या वर ओरडायला लागले.”चालेल कसा तो? काय डोके ठिकाणावर आहे का नाही तुझे,तो जरा कंटाळला आहे असे वाटल म्हणून मी त्याला wheel chair वर फिरायला नेले.

अचानक wheel chair माझ्या हातातून सुटली आणि वेगाने रस्त्यावर गेली गाड्या वेगाने येत होत्या त्यामुळे मला काही करता आले नाही.”आता हे प्रश्न कायमचे बंद झाले पाहिजेत परत जर हा विषय निघाला तर बघ.”असे म्हणून हे तिरमिरीत निघून गेले ” मग माझ्या लक्षात आले आता मलाच माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत ,दहा दिवस घरात राहून मी वेडी झाले होते सकाळी तयार होवून जेव्हा मी बँकेत निघाले ते हा नवऱ्यानं मला वेड्यात काढले ..आई आहे की कोण ? मुलगा गेला आहे आणि तर दिवस तुला घरात बसवत नाही का ?अस त्यानं ओरडून विचारल्यावर..मी तोंडाला कुलूप लावले आणि तेरा दिवस नंतर बँकेत जाताना मनाशी ठरवलं प्रश्न अनुत्तरित आहेत त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न चालू करायला हवा.

तीन महिन्यानंतर मला म्हणाला आपण नवे घर घेत आहोत .”का ?हे काय वाईट आहे ” “अग एकच बेडरूम आहे दोन बेडरूम चे मोठे घर घेऊया.” “पण पैसे कमी पडत होते म्हणून तर आपण नको म्हंटले ना घर..मग अचानक कुठून आले पैसे?”

“मी बाळाची पॉलिसी घेतली होती .”पंधरा लाखांची? “नाही ग,साडेसात लाख रुपयांची”.accident death आहे ना म्हणून दुप्पट मिळाले”.”पण मला कधी बोलला नाहीत”.”तुला काही कळते का ह्या गुंतवणुकी बद्दल,आज पर्यंत सगळे निर्णय मीच तर घेत आलो आहे.

बधीर डोके आणि बधीर मन घेऊन मी रोज बँकेत जात होते रूटीन चालू होते सगळ्यात असूनही मी कशातच नव्हते.एकदा असेच काम करत असताना कोणीतरी बोलत होते अरे ती बँकेत येते ना मॅडम LIC वाली ती आली की मला सांग ह माझे काम आहे तिच्याकडे.आणि अचानक मला माझा मार्ग सापडला मी त्या मॅडम ची चौकशी करायला लागले तेव्हा कळले की ती सोसायटी च्या ऑफिस मध्ये बसते .

ऑफिस मध्ये मी गेले ,”मला मॅडम ना भेटायचे आहे, ” “हो भेटा ना त्या उद्या येणार आहेत.”बरं,नाहीतर त्यांना सांग मला पॉलिसी घ्यायची आहे, नाहीतर नको ,नुसते काम आहे सांगा, ” मॅडम,काळजी करू नका ह्या मॅडम वेगळ्या आहेत त्या तुमचे काम नक्की करून देतील.पॉलिसी नाही घेतली तरी.”हुं , बरं. दुसऱ्या दिवशी माझे कामात लक्षच नव्हते सारखी फोन चेक करत होते, लंच टाईम मध्ये मला फोन आला.मी गेले ,”मला ना माझ्या मुलाची पॉलिसी करायची आहे,”हो करूया ना, मला माहिती द्याल सगळी, तो अपंग आहे चालता येत नाही ,”पॉलिसी होईल पण मला येऊन बघावे लागेल त्याची मेडिकल होईल आणि मग ऑफिस ने मान्य केले तर पॉलिसी मिळेल.”

माझ्याबरोबर येत जरा कॅन्टीन मध्ये बसुया.”येते हो जरा जाऊन ,असे म्हणत ती माझ्या बरोबर आली.कोपऱ्यातले टेबल बघून आम्ही बसलो.जरा आता खर काय ते सांगते मी तुम्हाला,असे म्हणत मी तिला सगळे सांगून टाकले.दोन चार क्षण ती काहीच बोलली नाही,आणि मग एकदम म्हणाली,कसे शक्य आहे हे,मी त्यांना किती वर्ष ओळखते त्यांच्या पॉलिसी ची काम करून देत होते म्हणून त्यांनी मला सांगितले मुलगा आहे अकरावीत त्याच्या साठी पॉलिसी हवी आहे .

मी घरी येते म्हंटल्यावर त्याचे क्लासेस असतात दिवसभर वेळ मिळत नाही ,त्यामुळे माझ्या वर विश्वास असेल तर फॉर्म द्या मी भरून आणून देतो, मलाही त्यात काही गैर वाटले नाही .पण जेव्हा आता पाच महिन्यापूर्वी त्याचा प्रीमियम भरायचा होता तेव्हा त्यांनी मला सांगितले त्याच्या अपघाता बद्दल.खूप वाईट वाटले पण मग आमच्या ऑफिस मध्ये सगळी चौकशी होते,तशी ती सुरू झाली,जेव्हा आम्ही तुमच्या घरी आलो तेव्हा ते बाहेरच भेटले ,सगळी माहिती दिली अपघाताची जागा दाखवली. “पण मग तुम्ही घरी नव्हता आलात का .” “नाही ते म्हणले घरी कुणीच नाही आहे कुलूप दाखवले “,”आम्हाला.कितव्या मजल्यावर म्हणालात तुम्ही आला होता,”,” पहिल्या मजल्यावर..”

एक प्रकारचा रीते पणा आला होता मला ,डोक्यात नुसते काहूर माजले होते,तरीही शांत राहून मी तिला म्हंटले ,मी इकडे मागेच राहते बँकेच्या घरी याल माझ्या आता.हो का नाही, मलाही त्यांना जाब विचारण्याची इच्छा आहे.नाही तुम्ही फक्त या . आम्ही घरी निघालो ,घरी आल्यावर चावीने दरवाजा उघडल्यावर हे म्हणाले आज लवकर कशी आलीस ? आणि LIC मॅडम ना बघून एकदम शांत झाले,इतक्या वर्षात जी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती एक बेफिकिरी होती ती एकदम नाहीशी झाली,मटकन खाली बसले ते.मी मागे वळून त्यांना म्हंटले बरं मॅडम गेलात तरी चालेल आता.जरा नवल करत पण लगेच मला समजून घेत त्या बाहेर पडल्या.

खुर्चीवर मी बसले काहीही ना बोलता.हे म्हणाले,”तू मला माफ कर , जरा चुकलेच माझे, पण आता जे झाले ते झाले आता आपणच आहोत एक मेकांना.”त्यांची ती मान भावी पणाची भाषा ऐकून मला त्यांची दया आली.एकच क्षण..आणि मग मी त्यांना सांगितले,”घाबरु नका ,मी कोणालाही सांगायला जाणार नाही,कुठेही बोलणार नाही,तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की आपण दोघे आहोत ह्या घरात,पुढच्या वर्षी तुम्ही रिटायर होणार मग दिवसभर घरीच असणार ,कारण तुम्हाला कोणी मित्र नाही. आपण एकत्र राहणार पण नवरा बायकोचे आपले नाते कधी नव्हतेच,पण आता एक माणूस म्हणूनही तुम्ही लायकीचे नाही आहात हे माझ्या लक्षात आले आहे,

तुमची शिक्षा एकच ,एकत्र राहून माझ्या नजरेतला हा विखार तुम्हाला रोज सहन करायचा आहे ..प्रत्येक क्षणी तुम्हाला माझी ही नजर जाळत राहील.माझ्या आयुष्यात तुम्ही आग लावली आहे ,जीवनात फक्त एकच ध्येय आहे माझे ,तुमच्या चेहऱ्यावरची ही भीती सतत मी जागती ठेवणार.आणि हीच तुमची शिक्षा असणार.

बँकेत जाताना डोके हलके आणि मन भरून आले होते…

घरी आल्यावर माझा दिनक्रम ठरला सकाळी चार ला उठून बाळाचे सगळे करून झाल्यावर त्याला थोडे भरवायचे आई बाबांना जेवण करून ठेवायचे आणि साडे नऊ च्या ठोक्याला घर सोडायचे ..साडेसहा ला घरी आल्यावर परत तेच.गेल्या दहा वर्षात माझ्या ह्या दिनक्रमात काडीचाही बदल झाला नव्हता.पण गेल्या वर्षी अगदी साधे निमित्त होऊन आई आणि बाबा सहा महिन्याच्या अंतराने गेले.आणि मी अनाथ झाले..पुढचे भविष्य मला इतके अंधारात दिसत होते की काही सुचत नव्हते.

शेजारणी ने एक पन्नाशी ची बाई मला आणून दिली .खूप प्रेमळ होती कामसू होती.आणि मुख्य म्हणजे तिला कामाची गरज होती.रोज सकाळी ती नऊ ला हजार व्हायची.बाळाला मालिश करायची अंघोळ घालायची भरवायची..आणि मग मी आले की जायची.खूप वर्षांनी मला जरा श्वास घ्यायला मिळत होता.

आणि आज माझ्या बाळाचा अठरावा वाढदिवस होता म्हणून मी त्याला सकाळीच विश करून चॉकलेट चा एक तुकडा भरवला होता बाकीचा फ्रिज मध्ये ठेवून दिले.अशी किती चॉकलेट्स फ्रिज मध्ये पडली होती त्याचा मी हिशोब करणेच सोडून दिले होते.हसू नका आई आहे मी त्याला कळत नसले तरी मला माहित होते ना त्याचा वाढदिवस.असो..शेवटी आईचे मन..

ऑफिसला निघाले तर नवरा म्हणाला मला जरा बरे वाटत नाही आहे त्यामुळे मी ऑफिस ला जाणार नाही आहे..एक क्षण वाटले विचारावे पण मनाने चक्क नकार दिला .म्हणाला फार आगाऊ पणा करू नकोस चल ….आणि मनाचे ऐकून मागे वळूनही ना बघता मी बँकेत निघाले .बऱ्याच वर्षांनी नवरा नाही त्यामुळे जरा मोकळी झाले होते.एकत्र मैत्रिणीबरोबर डबा खाल्ला जरा हसलो आणि तेवढ्यात फोन वाजला…भोवळ आल्याने मी पडले एवढेच मला आठवत होते.मला घरी कोणी आणले कसे आणले..मला काही माहित नाही.

घरामध्ये चार माणसे जमा झाली होती पोलिस आले होते.काय झाले …कसे झाले ओरडत मी घरात आले.जमिनीवर माझे बाळ निश्चेष्ट पडले होते.. बाळा….असे ओरडत मी त्याच्या अंगावर पडले त्याला हाका मारत राहिले.पण जिवंत असताना ज्याला माझा स्पर्श कळतं नव्हता त्याला आता काय कळणार ..मुश्किलीने मला माझ्या मैत्रीणीने बाजूला केले मला आत नेले.नवऱ्याने डॉक्टरांना सांगून मला झोपेचे इंजेक्शन दिले…….

जेव्हा मला जाग आली तेव्हा घर शांत झाले होते नवऱ्याला परत परत मी विचारात राहिले मी की कसा अपघात झाला ..तो एकटा कसा बाहेर गेला . दुसऱ्या दिवशी मावशी आल्या ,आल्या ताशा पायावर पडल्या आणि म्हणाल्या माझ्या मुळे झाले हे सगळे मला माफ करा…मला गावाहून फोन आला सासरे आजारी झाले आहेत.साहेब म्हणले मी आहे घरात जा तुम्ही..गावाला पोहोचले तर सासरे चांगले होते कोण मुडद्याने फसवले काय माहित.

पण मग सगळे म्हणायला लागले की आलीस तर रहा एक दिवस म्हणून आज आले ..मी असते तर असे झाले नसते….तिच्या गद गदनाऱ्या शरीराला मी उचलले आणि म्हंटले पण मावशी तो चालत होता खरंच ..मला कसे नाही कळले…. नाय ग बाय कसा चालणार तो,नाही म्हणजे तुम्ही मालिश करता होता ना …मग….अग बाय माजे ते आपले समाधान…तू सावर स्वतःला ,तेवढ्यात हे आत आले आणि माझ्या वर ओरडायला लागले.”चालेल कसा तो? काय डोके ठिकाणावर आहे का नाही तुझे,तो जरा कंटाळला आहे असे वाटल म्हणून मी त्याला wheel chair वर फिरायला नेले.

अचानक wheel chair माझ्या हातातून सुटली आणि वेगाने रस्त्यावर गेली गाड्या वेगाने येत होत्या त्यामुळे मला काही करता आले नाही.”आता हे प्रश्न कायमचे बंद झाले पाहिजेत परत जर हा विषय निघाला तर बघ.”असे म्हणून हे तिरमिरीत निघून गेले ” मग माझ्या लक्षात आले आता मलाच माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत ,दहा दिवस घरात राहून मी वेडी झाले होते सकाळी तयार होवून जेव्हा मी बँकेत निघाले ते हा नवऱ्यानं मला वेड्यात काढले ..आई आहे की कोण ? मुलगा गेला आहे आणि तर दिवस तुला घरात बसवत नाही का ?अस त्यानं ओरडून विचारल्यावर..मी तोंडाला कुलूप लावले आणि तेरा दिवस नंतर बँकेत जाताना मनाशी ठरवलं प्रश्न अनुत्तरित आहेत त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न चालू करायला हवा.

तीन महिन्यानंतर मला म्हणाला आपण नवे घर घेत आहोत .”का ?हे काय वाईट आहे ” “अग एकच बेडरूम आहे दोन बेडरूम चे मोठे घर घेऊया.” “पण पैसे कमी पडत होते म्हणून तर आपण नको म्हंटले ना घर..मग अचानक कुठून आले पैसे?”

“मी बाळाची पॉलिसी घेतली होती .”पंधरा लाखांची? “नाही ग,साडेसात लाख रुपयांची”.accident death आहे ना म्हणून दुप्पट मिळाले”.”पण मला कधी बोलला नाहीत”.”तुला काही कळते का ह्या गुंतवणुकी बद्दल,आज पर्यंत सगळे निर्णय मीच तर घेत आलो आहे.

बधीर डोके आणि बधीर मन घेऊन मी रोज बँकेत जात होते रूटीन चालू होते सगळ्यात असूनही मी कशातच नव्हते.एकदा असेच काम करत असताना कोणीतरी बोलत होते अरे ती बँकेत येते ना मॅडम LIC वाली ती आली की मला सांग ह माझे काम आहे तिच्याकडे.आणि अचानक मला माझा मार्ग सापडला मी त्या मॅडम ची चौकशी करायला लागले तेव्हा कळले की ती सोसायटी च्या ऑफिस मध्ये बसते .ऑफिस मध्ये मी गेले ,”मला मॅडम ना भेटायचे आहे, ” “हो भेटा ना त्या उद्या येणार आहेत.”बरं,नाहीतर त्यांना सांग मला पॉलिसी घ्यायची आहे, नाहीतर नको ,नुसते काम आहे सांगा, ” मॅडम,काळजी करू नका ह्या मॅडम वेगळ्या आहेत त्या तुमचे काम नक्की करून देतील.पॉलिसी नाही घेतली तरी.”हुं , बरं.

दुसऱ्या दिवशी माझे कामात लक्षच नव्हते सारखी फोन चेक करत होते, लंच टाईम मध्ये मला फोन आला.मी गेले ,”मला ना माझ्या मुलाची पॉलिसी करायची आहे,”हो करूया ना, मला माहिती द्याल सगळी, तो अपंग आहे चालता येत नाही ,”पॉलिसी होईल पण मला येऊन बघावे लागेल त्याची मेडिकल होईल आणि मग ऑफिस ने मान्य केले तर पॉलिसी मिळेल.” माझ्याबरोबर येत जरा कॅन्टीन मध्ये बसुया.”येते हो जरा जाऊन ,असे म्हणत ती माझ्या बरोबर आली.

कोपऱ्यातले टेबल बघून आम्ही बसलो.जरा आता खर काय ते सांगते मी तुम्हाला,असे म्हणत मी तिला सगळे सांगून टाकले.दोन चार क्षण ती काहीच बोलली नाही,आणि मग एकदम म्हणाली,कसे शक्य आहे हे,मी त्यांना किती वर्ष ओळखते त्यांच्या पॉलिसी ची काम करून देत होते म्हणून त्यांनी मला सांगितले मुलगा आहे अकरावीत त्याच्या साठी पॉलिसी हवी आहे .मी घरी येते म्हंटल्यावर त्याचे क्लासेस असतात दिवसभर वेळ मिळत नाही ,त्यामुळे माझ्या वर विश्वास असेल तर फॉर्म द्या मी भरून आणून देतो, मलाही त्यात काही गैर वाटले नाही .

पण जेव्हा आता पाच महिन्यापूर्वी त्याचा प्रीमियम भरायचा होता तेव्हा त्यांनी मला सांगितले त्याच्या अपघाता बद्दल.खूप वाईट वाटले पण मग आमच्या ऑफिस मध्ये सगळी चौकशी होते,तशी ती सुरू झाली,जेव्हा आम्ही तुमच्या घरी आलो तेव्हा ते बाहेरच भेटले ,सगळी माहिती दिली अपघाताची जागा दाखवली. “पण मग तुम्ही घरी नव्हता आलात का .” “नाही ते म्हणले घरी कुणीच नाही आहे कुलूप दाखवले “,”आम्हाला.कितव्या मजल्यावर म्हणालात तुम्ही आला होता,”,” पहिल्या मजल्यावर..”

एक प्रकारचा रीते पणा आला होता मला ,डोक्यात नुसते काहूर माजले होते,तरीही शांत राहून मी तिला म्हंटले ,मी इकडे मागेच राहते बँकेच्या घरी याल माझ्या आता.हो का नाही, मलाही त्यांना जाब विचारण्याची इच्छा आहे.नाही तुम्ही फक्त या . आम्ही घरी निघालो ,घरी आल्यावर चावीने दरवाजा उघडल्यावर हे म्हणाले आज लवकर कशी आलीस ? आणि LIC मॅडम ना बघून एकदम शांत झाले,इतक्या वर्षात जी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती एक बेफिकिरी होती ती एकदम नाहीशी झाली,मटकन खाली बसले ते.मी मागे वळून त्यांना म्हंटले बरं मॅडम गेलात तरी चालेल आता.

जरा नवल करत पण लगेच मला समजून घेत त्या बाहेर पडल्या.खुर्चीवर मी बसले काहीही ना बोलता.हे म्हणाले,”तू मला माफ कर , जरा चुकलेच माझे, पण आता जे झाले ते झाले आता आपणच आहोत एक मेकांना.”त्यांची ती मान भावी पणाची भाषा ऐकून मला त्यांची दया आली.एकच क्षण..आणि मग मी त्यांना सांगितले,”घाबरु नका ,मी कोणालाही सांगायला जाणार नाही,कुठेही बोलणार नाही,तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की आपण दोघे आहोत ह्या घरात,पुढच्या वर्षी तुम्ही रिटायर होणार मग दिवसभर घरीच असणार ,कारण तुम्हाला कोणी मित्र नाही. आपण एकत्र राहणार पण नवरा बायकोचे आपले नाते कधी नव्हतेच,पण आता एक माणूस म्हणूनही तुम्ही लायकीचे नाही आहात हे माझ्या लक्षात आले आहे,

तुमची शिक्षा एकच ,एकत्र राहून माझ्या नजरेतला हा विखार तुम्हाला रोज सहन करायचा आहे ..प्रत्येक क्षणी तुम्हाला माझी ही नजर जाळत राहील.माझ्या आयुष्यात तुम्ही आग लावली आहे ,जीवनात फक्त एकच ध्येय आहे माझे ,तुमच्या चेहऱ्यावरची ही भीती सतत मी जागती ठेवणार.आणि हीच तुमची शिक्षा असणार.

बँकेत जाताना डोके हलके आणि मन भरून आले होते…

शिक्षा | Forfeit | Penalty | Sentence -© श्रद्धा राजेश..

शिक्षा | Forfeit | Penalty | Sentence हा कथा अवडला असल्यास शेअर करा.

शिक्षा | Forfeit | Penalty | Sentence – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share शिक्षा | Forfeit | Penalty | Sentence

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO