Mother - Single parent

आई – एकल पालक | Mother – Single Parent

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Mother – Single Parent

कावेरी एक single parent, तिच्या पंधरा वर्षांच्या मुलीसोबत प्रिया सोबत तिच्या लहानशा घरात रहात असे. घरी दोघीच सुखासामाधानात असायच्या. कावेरीच्या घरापासून थोडंच दूर तिच्या भावाचं, केतनचं सुद्धा घर होतं, तो येऊन जाऊन असायचा. नवऱ्याच्या मृत्यूनंतर भावाच्या संसारात आपली ढवळाढवळ होऊ नये म्हणून दहा वर्षांपूर्वी तिने वेगळं राहण्याचा फार विचारपूर्वक घेतलेला हा निर्णय. शिवाय त्यामुळे ती स्वतंत्र तर होतीच पण काही लागलंच तर भाऊ वहिनी हाकेच्या अंतरावर.

खरं तर कावेरीच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्या घरचे तिला दुसरं लग्न (second marriage) करण्यासाठी फार मागे लागले होते, पण प्रिया त्यावेळी लहान होती, तिचा विचार करून कावेरी लग्नाला तयार झाली नाही. शिवाय जर लग्न करायचंच तर होणाऱ्या नवऱ्याने मुलीसहित मला स्वीकारावे ही तिची एकमेव अट होती. जी पूर्ण होऊ न शकल्याने तिच्या दुसऱ्या लग्नाचा विषय हळूहळू बंद झाला. मात्र नवऱ्याच्या जागी तिला नोकरी लागली आणि मुलगी, घर, नोकरी अशी तारेवरची कसरत करत करत ती हे सर्व सांभाळण्यात तरबेज बनली.

आता तिच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, प्रिया साठी जगायचं, तिला काही कमी पडू द्यायचं नाही.प्रियाला लहानपणापासूनच तिचं संपूर्ण attention मिळत आलं होतं.कावेरीनिसुद्धा प्रियापेक्षा इतर कोणत्याही गोष्टीला कधीच जास्त महत्व दिलं नाही. कायम ती प्रियासाठी हजर असायची, कधीकधी अगदी ऑफिस मधून सुट्टी घेऊन सुद्धा. तिला नेहमी वाटायचं आपल्या मुलीला वडीलांची कधी उणीव भासू नये.

प्रिया यंदा दहावीला होती. शाळा, अभ्यास, क्लासेस यामध्ये ती जास्त busy राहू लागली. ती रात्री अभ्यास करायची तेव्हा कावेरीसुद्धा तिच्यासोबत जागायची. तिला चहा, कॉफी करून द्यायची. तिचे सर्व अपडेट ठेवायची. ज्यावेळी प्रियाचे बोर्डाचे पेपर होते तेव्हा तर कावेरीने पेपर संपेपर्यंत सुट्टी टाकली,तिला पेपरला सोडायला आणि घ्यायलाही स्वतः जायची.कारण प्रियाला संपूर्ण कन्सेन्ट्रेशन नी अभ्यास करता यावा, काही हवं असेल तर मध्ये उठायला लागू नये.तिला पेपरला सोडायला आणि घ्यायलाही स्वतः जायची.त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्या दोघी जरा जास्त सोबत राहू शकल्या होत्या.

केतन प्रियाची परीक्षा संपायचीच वाट बघत होता. त्याचं घरी बायकोशी कधीच बोलून झालं होतं. प्रियाची परीक्षा संपताच त्यानं कावेरीकडे विषय काढला. त्याच्या एका मित्राचं साकेतचं,दुसरं लग्न करायचं होतं तर साकेतच्या आईनी केतनला घरी बोलावून त्याला कावेरीच्या लग्नाबद्दल विचारलं होतं.त्यांची ईच्छा होती की कावेरी आणि साकेतचं लग्न व्हावं. केतन साकेतला खूप वर्षांपासून ओळखत होता. त्याचं घर, नोकरी सुद्धा छान होतं.साकेत सर्व बाबतीत कावेरीसाठी योग्य होता. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पूर्वपत्नीचं निधन झाल्यानंतर तो फार डिप्रेशन मध्ये गेला होता,आता कुठे लग्नाला तयार झाला होता.कावेरीच्याच वयाचा होता, त्याला मुलबाळ नव्हतं. शिवाय त्यांच्याकडूनच विचारणा झाल्यामुळे केदारला हे लग्न व्हावं असंच वाटत होतं.

केदार सर्वप्रथम आपल्या पत्नीसोबत या विषयावर बोलला आणि तिच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच तो कावेरीशी बोलणार होता.कावेरी सुरुवातीला लग्नासाठी तयारच झाली नाही , पण केदारनी समजावून सांगितलं,’प्रियालाही बाबा मिळेल आणि साकेत चांगल्या परिचयातला होता, सुस्वभावी, निर्व्यसनी, त्याची आईसुद्धा खूप छान.’कावेरीने पूर्ण विचार करावा आणि त्यासाठी हवा तेवढा वेळ घ्यावा व एकदोनदा साकेतला भेटावं म्हणजे निर्णय घेणं सोपं जाईल, असं त्याने कावेरीला समजवलं. नंतर दोन चार दिवसांतच वहिनी येऊन भेटली, तिनं देखील भविष्याचा विचार करून निर्णय घे असं सांगितलं. शिवाय पुढच्या दोन वर्षांत प्रिया पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी गेली की कावेरी एकटी पडणार होती, हेसुद्धा वहिनीने तिला ध्यानात आणून दिलं.त्यानंतर कुठे ती साकेतला भेटायला तयार झाली.

पहिल्या भेटीतच साकेत किती mature आहे आणि तो प्रियाला मनापासून स्वीकारेल हे कावेरीच्या लक्षात आलं. ह्या वयात लग्न करणं म्हणजे समजून उमजून आणि खूप सावधगिरीने तिला निर्णय घ्यावा लागणार होता. शिवाय ह्या वयात येईपर्यंत लोक कळायला लागतात. त्यामुळे ती साकेतला नीट पारखून घेत होती. काही महिन्यांच्या भेटी आणि पूर्ण विचारानंती ती लग्नाला तयार झाली. साकेत अधूनमधून तिच्या घरी सुद्धा येऊ लागला, त्यामुळे प्रियाच्या पण तो छान परिचयाचा झाला.पण आता प्रश्न होता प्रियाला हे सर्व सांगण्याचा……वहिनीने ही जबाबदारी स्वतःवर घेतली.

एका सुटीच्या दिवशी प्रिया मामाकडे गेलेली असतांना मामा आणि मामीने फार काळजीपूर्वक तिच्यापुढे हा विषय काढला.’तू पुढे शिक्षणासाठी बाहेरगावी जाशील, नंतर लग्न होईल, आई एकटी पडेल, आतापर्यंत तुझ्यासाठी म्हणून तिने लग्नाचा विचार टाळला, पण अजूनही वेळ निघून नाही गेली, तू समजून घेशील.’असं सर्व ते दोघे खूप वेळपर्यंत बोलत राहिले. प्रियासाठी हे सर्व फार धक्कादायक होतं. ती काही react झाली नसली तरी तिच्या डोक्यात असंख्य विचारांनी गर्दी केली होती.

इतकी वर्ष फक्त आई आणि ती दोघीच असायच्या, त्यात अजून एक व्यक्ती येणार होती. प्रियाला तिच्या अती हक्काच्या आईला अजून एका व्यक्तीसोबत share करावं लागणार होतं. इतकंच काय तर अनोळखी लोकांच्या सोबत त्यांच्या घरी जाऊन राहावंही लागणार होतं.कुणी बाहेरची व्यक्ती येऊन तिच्यावर हक्क गाजवणार होती. अजून कितीतरी compromises तिला करावे लागू शकणार होते. आणि आई…… ‘आईचं काय, आतापर्यंत सुखातच तर होती की, काय गरज होती तिला तरी लग्नाला तयार व्हायची, नंतर एकटी का पडेल, मामा आहेच की, हे लग्नाचं वय आहे का…..’प्रियाला हे सर्व अजिबात आवडलेलं नव्हतं. पण काही म्हणायची सोय राहिली नव्हती.सरळसरळ आईजवळ बोलावं तर ती मामीला सांगेन आणि मामी पुन्हा आपला क्लास घेईल. प्रियाचं तर डोकंच भणकायला लागलं.

काही दिवस गेल्यावर एक दिवस कावेरी संध्याकाळी ऑफिस मधून घरी आली तेव्हा प्रिया तिच्याजवळ आली आणि सांगू लागली,”आई अगं आज ते साकेत काका आले होते दुपारी, खूप वेळ थांबले, तू घरी नव्हतीस तरीही.आणि फार विचित्र वागत होते,त्यांची नजर आज खूपच वेगळी वाटत होती मला, म्हणजे आपल्याला कळतंच न गं, मला नाही बाई आवडलं त्यांचं येणं, थांबणं आणि बघणं. मला ते काका अजिबात आवडत नाहीत आता.”

कावेरीला माहीत होतं तिचा भाऊ केदार आणि साकेत दोघे कंपनीच्या कामकनिमित्त दोन तीन दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. तरीही खात्री करून घेण्यासाठी तिने केदारला फोन करून विचारलं तर साकेत आणि केदार दिवसभर सोबतच होते. प्रिया खोटं बोलत होती हे कावेरीला लगेच कळलं. तिला हेसुद्धा माहीत होतं की तिची वहिनी आणि भाऊ साकेतबद्दल प्रियाशी बोलले होते. त्यामुळे या प्रसंगावरून काय समजायचं ते ती समजून चुकली.

त्या रात्री ती खूप वेळ रडली, यासाठी नाही की प्रियाला साकेतबद्दल problem होता तर यासाठी की ज्या आपल्या मुलीसाठी तिने आतापर्यंत सारं काही केलं, प्रसंगी स्वतःचा विचारही केला नाही ती आपली लेक इतकी स्वार्थी झाली होती की स्वतःपुढे ती कुणाचाच विचार करत नव्हती. आज आई (Mother) म्हणून आपण fail झालोय, संपूर्ण आयुष्य ज्या मुलीसाठी जगलोय तिला घडवण्यात आपण कमी पडलो.एखादी गोष्ट आवडली नाही अथवा नको असेल तर ते तिने आपल्याला स्पष्टपणे सांगायला हवे होते, मात्र तिने तसे न करता साकेतबद्दल तोंडाला येईल ते आपल्याजवळ सांगितले.ती इतकी आत्मकेंद्री कधी झाली आणि आपल्या लक्षातच आलं नाही, याचं कावेरीला फार वाईट वाटलं.

दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळीच कावेरीने साकेतला बोलावून घेतलं, आणि प्रियाला याची काही कल्पना न देता तिला घरीच राहण्यास सांगितलं. साकेत आला तेव्हा प्रियाला पण तिने बैठकीत बोलावून घेतलं. साकेतला ती म्हणाली, “अरे मागच्या वेळी तू आलास तेव्हा मी घरी नव्हते, म्हणून बोलावलं तुला.”त्याला काही कळलंच नाही, कारण कावेरी घरी नसतांना तो कधीच आला नव्हता.त्यानं तिच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितलं. त्यावर कावेरी म्हणाली, “अरे, प्रिया सांगत होती, आता परवाच आला होतास न तू दुपारी, काय ग प्रिया?”प्रियाला आता काहीच सुचत नव्हतं.तिच्या मनाची चाललेली घालमेल कावेरीला समजली. त्याकडे त्यावेळी तिने लक्ष दिले नाही. तिने साकेतला लग्नासाठी नकार दिला. आपली मनाची तयारी होत नसल्याचं त्याला सांगितलं. तो निघून गेल्यावर प्रिया तिला खोटं बोलल्याबद्दल माफी मागू लागली. तर प्रियाला आपल्या समोर बसवून ती म्हणाली,”you hurted me a lot, मी पुन्हा लग्न करू नये असं तुला वाटत होतं तर सांगायचंस गं, तू जे काय खोटं बोलून साकेतच्या character वर ताशेरे उडवलेस ते माझ्या मनाला फार लागलं, मीच आई म्हणून कुठेतरी कमी पडलीय त्यामुळे तू sorry नको म्हणूस, मला तुझ्यावर चांगले संस्कार करता आले नाही. प्रिया रडू लागली, तिने आपल्या आईची खूपदा माफी मागितली व निर्णय बदलण्यास सांगितले.

कावेरी तिला म्हणाली,”माझा राग शांत झाला की तुझ्याशी मी नेहमीसारखी वागेन, बोलेन. पण ही गोष्ट कायम तुझ्या लक्षात रहावी, म्हणून मी माझ्या निर्णयात काहीच बदल करणार नाही. यापुढे तुझ्या मनात असं काही आलं तर या क्षणाची तुला कायम आठवण राहिल.

आई – एकल पालक | Mother – Single Parent हा लेख अवडला असल्यास शेअर करा. –©प्रज्ञा गवई

आई – एकल पालक | Mother – Single parent हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

आई – एकल पालक | Mother – Single Parent – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Shar आई – एकल पालक | Mother – Single Parent

You may also like

5 thoughts on “आई – एकल पालक | Mother – Single Parent

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO