Mother In a new role

आई: नव्या भूमिकेत | Mother In a new role

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Mother In a new role

भूमिका परस्पर कधी बदलल्या समजलंच नाही. माझी मुले, “माझी आई (mother)” कधी झाले हे कळलंच नाही. पण तरी खूप छान वाटतंय !

बालपणी ज्यांना चिऊ काऊ चे घास भरवले, आज ते मला, “आई खाऊन बघ छान आहे” म्हणून आपल्या घासातला घास भरवतात. खूप छान वाटतंय !

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई. आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात. खूप छान वाटतय !

ज्यांची बोट धरुन अक्षरांशी ओळख करून दिली, आज ते माझी नवीन टेक्नोलॉजीशी ओळख करुन देतात. किती मजा वाटते आहे मला !

ज्यांना हात धरुन मी रस्ता ओलंडला, आज ते माझा हात धरुन रस्ता ओलंडतात. हातांची अदलाबदल कधी झाली ते मला कळलच नाही. पण खूप छान वाटतय !

चालतांना “उड्या मारु नकोस रे पडशील” असं म्हणणारी मी. आणि आज, “आई हळू, पुढे खड्डा आहे” म्हणणारे ते ! एवढा प्रवास कधी झाला हे मला कळलंच नाही. पण खूप छान वाटतय !

रिक्षेने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी, आज जागा केव्हा बदलल्या समजलच नाही मला. पण खूप छान वाटतय !

“प्रयत्न करून बघ ! शिकवलय ना मी तुला !” असे म्हणणारी मी आणि आज, “सोपय गं ! एकदा शिकलीस की येईल तुला” असे सांगणारे ते ! किती गम्मत वाटते आहे !

ज्यांच्या बरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते “आई हे गाणं ऐकलस का, बीट्स आवडतील बघ तुला” असं म्हणतात, तेव्हा काय सांगू काय वाटतं ! लय भारी वाटतय !

शाळेच्या पिक्निक ला जाताना बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बस मध्ये बसवणारे ते ! शब्द तेच, काळजी तीच, भूमिका मात्र बदलल्या ! किती मस्त वाटतय !

त्यांना काही होत असेल तर घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर कासावीस होणारे ते ! किती कृतकृत्य वाटतय !

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे हे सांगणारी मी ! आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात ! किती अभिमान वाटतो !

मुले घरात दिसली नाहीत तर कासावीस होणारे बाबा आणि आज, “हे काय, बाबा अजून आले नाहीत?” म्हणणारी मुलं ! परत शब्द तेच, काळजी तीच, भूमिका मात्र कधी बदलल्या हे समजलच नाही !

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले ! खूप छान वाटतय !

नकळत संस्कार घडले. नकळत भूमिका बदलल्या. नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला. खूप धन्य वाटतंय !

तुमच्या मातृत्वाचे सौभाग्य मिळाले आणि आयुष्याचा प्रत्येक दिन हा मातृदीन झाला !

-©सौ.अर्चना दिनकर फडके

विलेपार्ले (मुंबई)

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

आई : नव्या भूमिकेत | Mother In a new role हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

आई : नव्या भूमिकेत | Mother In a new role – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share आई : नव्या भूमिकेत | Mother In a new role

You may also like

4 thoughts on “आई: नव्या भूमिकेत | Mother In a new role

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO