पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
The Friend Went Away – Virhini
बंधुप्रेमा लक्ष्मणाच्या वर्णिले रामायणी
हाय येथे आसू नयनि उर्मिला ती विरहिणी
गेला सखा तो दूर देशी ना निरोप घेतला
चंदन तनु जाळीतसे केश भार मोकळा
शून्य हा प्रासाद गमतो विरह मुळी ना साहवे
प्रीय मजला पर्ण कुटी ही नाथ जरि माझ्यासवे
सौभाग्य सुख हे उर्मिलेचे नाथ तुम्ही ना जाणिले
समिप तुमच्या राहण्याचे भाग्य होते आगळे
ऋतु कितीक संपले अधुरी तरी कहाणी
अमर त्याग सांगतो अशी ही एक विराणी
©पुष्पा पेंढरकर
3 thoughts on “सखा गेला दूर देशी – विरहिणी | The Friend Went Away – Virhini”