Self Dependent

आत्मनिर्भर | Self Dependent

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Self Dependent

रात्रीचे 12 वाजले होते…. तरी देखील गीताला झोप येत नव्हती….. गादीवर इकडून तिकडे कुस बदलणे चालू होते …. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते……15 वर्षा पूर्वीचा काळ आठवला होता…. त्या वेळेसचे तिचे जीवन किती दुःख दायक होते….!!!! नुसत्या विचारानेच तिच्या डोळ्यातून अश्रूंचे लोट वाहत होते……

पंधरा वर्षांपूर्वी तिचे महेश सोबत लग्न झाले. सुखी संसाराचे स्वप्न घेऊन तिने सासरी प्रवेश केला. घरातील वातावरण एकदम चांगले होते, सासू सासरे एक नणंद जीव लावीत असे. नणंद तर तिची मैत्रीणच होती.. नेहमी वहिनी वहिनी म्हणून मागे फिरायची, तिच्या पेक्षा दोनच वर्षांनी लहान होती. सासूबाई पण तिला स्वयंपाकात मदत करीत असत. जे येत नाही ते अगदी प्रेमाने आई सारखे शिकवत असत. महेशला हे आवडते…… तू आज ही भाजी कर…. कधी गोड पदार्थ करायला सांगत असत. एकदम खेळीमेळीचे वातावरण होते. तिचा दिवस कसा जायचा, हे पण तिला समजत नसे.

महेश ऑफिस मधून आल्यानंतर त्याला हातपाय पुसण्यासाठी टॉवेल देणे. त्याच्या साठी छान आद्रक चा चहा करून द्यायला तिला आवडत असे. त्याच्या साठी बूट पॉलिश पासून त्याच्या कपड्यांना इस्त्री करणे हे सर्व काम ती आवडीने, मनापासून करीत असे.

पण लग्ना नंतर कांहीं दिवसांनी तिच्या लक्षात आले की,….. महेश जेवढ्या पुरत तेवढेच बोलतो…. जास्त बोलत नाही… बाहेर फिरायला घेऊन जात नाही. पण नवीन असल्या मुळे गीताने एवढे सिरीयसली घेतले नाही. तिला वाटले हळू हळू महेश मध्य बदल होईल. आपल्या प्रेमाच्या ताकदीने आपण त्याला आपलेसे करू….. …. …!!!!

एक दिवस एक दूरचे नातेवाईक पत्रिका घेऊन आले आणि महेशला, गीताला लग्नाला घेऊन येण्यास आग्रह करू लागले. महेश जास्त कांहीं बोलला नाही. येतो म्हणून सांगितले. गीताला खुप खुप आनंद झाला……, लग्ना नंतर दोघांना पहिल्यांदाच बाहेर जायला मिळणार…… आठ दिवसांनी लग्न होते तिची आज पासूनच तयारी सुरू झाली……. सासू सासरे दोघांनी सांगितले तूम्ही दोघे मिळून जा. नंदेने वहिनीला विचारले, कांहीं लागत असेल तर मला सांगा मी मार्केट मधून आणून देईल. आठ दिवस भुर्रकन निघून गेले. महेश गप्प होता कांहीं बोलत नव्हता.

महेश ऑफिसला जायला निघाला तसे आईने सांगितले आज लवकर ये. लग्नाला जायचे आहे. लग्न संध्याकाळी 7 वाजता आहे.

गीता खुप उत्सुक होती.गीताने तो पर्यंत छान आवरून ठेवले काठा पदराची जांभळ्या रंगाची साडी नेसली. केसांचा अंबाडा बांधला. तिची नणंद सुरभी ने कॉलेज मधून येता येता मोगऱ्याचा गजरा आणला होता. तो छान अंबाड्यावर माळला. हलके फुलके मेकअप केले, सासूने दागिने दिले ते घातले. आणि महेश ची वाट पाहत उभी राहिली…….. ..

महेश फक्त पंधरा मिनिटं अगोदर आला. चहा घेऊन आणि कपडे बदलून ते दोघे लग्नासाठी निघाले. महेश रस्त्यांनी कांहींच बोलला नाही. लग्न मंडपात गेल्या बरोबर एका ओळखीच्या नातेवाईकांकडे गीताला सुपूर्त केले आणि सांगितले लग्न झाल्याबरोबर काकुन बरोबर जेवण कर आपण लगेच निघु असे सांगून तो मित्रांसोबत जाऊन बसला. गीताला थोडे विचित्र वाटले पण तिने मनावर घेतले नाही ………….

काकू तिला प्रश्न विचारत होत्या……..

तुझे शिक्षण किती….??? तू काय करतेस….?

गीता थोडी अपसेट होती महेशला शोधत होती….. त्याला शोधत शोधत तिने सांगितले………

मी फक्त 12 वी पास आहे. मी एका खेड्यातली आहे. शिक्षणाची सोय नव्हती आणि आई वडिल बाहेर गावी शिकण्यासाठी परवानगी देत नव्हते म्हणून कशी तरी 12 वी पर्यंतच शिकले…. काकूने तिला खुप प्रश्न विचारले…..पण तिला इंटरेस्ट नव्हता…. तरी देखील ती बोलत होती पण लक्ष अजिबात नव्हते……….

एकदाचे लग्न लागले….. . जेवणही झाले तरी महेशचा पता नव्हता. तिला आता खुप अस्वस्थ वाटू लागले…. ती गप्प होती तेवढ्यात काकूने एक शेवटचा प्रश्न विचारला…..? महेश तुला जीव लावतो का ग…,? ती थोडी गोंधळली, काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागली….. कारण सध्या तिच्या मनात तोच प्रश्न गोंधळ घालत होता.. .. महेश असा का वागत असेल… एवढा वेळ झाला… माझी एकदाही विचारपूस करायला आला नाही…..!!!! वगैरे वगैरे….. ती अचानक भानावर आली आणि काकूला म्हणाली,….. ‘” महेश माझ्यावर खुप खुप प्रेम करतो'”……!!!!.डोळ्यात मात्र निर्विकार भाव होते…!!! थोड्या वेळाने महेश आला कांहीही चौकशी न करता……., चल आपल्याला खुप खुप उशीर झाला आहे असे बोलून चालायला लागला……..!!! ती त्याच्या मागोमाग निघाली. जाताना पण रस्त्यांनी तो कांहीच बोलला नाही….???.

घरी पोहोंचल्या बरोबर सुरभी म्हणाली वहिनी तुम्ही आज खुप खुप सुंदर दिसत आहात. तेवढ्यात सासूबाई आल्या आणि गीताला म्हणाल्या, लग्नानंतर पहिल्यांदा एवढे छान आवरलेस, आणि खरोखर आज तुझी दृष्ट काढावी लागणार…. …….. गीता हसली आणि चेंज करण्यासाठी बेड रूम मध्ये निघून गेली…….

गीता स्वभावाने अबोल आणि भिडस्त असल्यामुळे तिने आजपर्यंत महेशला कांहींच विचारले नाही……!!! डोक्यात मात्र महेशला विचारण्यासाठी खुप प्रश्न थैमान घालत होते. मनात वादळ पेटलेले होते…… !!!पण ती बाहेरून गप्प होती. महेश एव्हाना झोपी पण गेला होता. गीता मात्र खिडकीतून एकटक चंद्राकडे पाहत जागीच होती…….!!! महेशला विचारण्या साठी मनात बऱ्याच प्रश्नांची मालिका तयार करीत होती…..????

भराभर दिवस निघून गेले. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. दोन दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता. घरात सर्व पहिल्या वाढ दिवसाची योजना आखित होते. सुरभी तर खुप एक्साईड होती,…… तिने तर मैत्रणीची लिस्ट तयार करून ठेवली होती. सासू,सासरे, सुरभी यांनी प्लॅन केला घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करू. मित्र मंडळी, नातेवाईक सर्वांना बोलावू,दारात मंडप टाकू, आचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देऊ. योजना आखून झाली. संध्याकाळी महेश आल्यावर, चहापाणी झाले की सर्वांनी विषय काढला.महेशला नियोजन करायला सांगितले, मित्रांची,नातेवाईकांची लिस्ट करायला सांगितली.

महेश कांहीच बोलत नव्हता…..!!! कांहीं तरी विचार करण्यात गुंग होता…..!!! मग अचानक म्हणाला आम्ही दोघे फिरायला जाऊ आणि तिकडेच वाढदिवस साजरा करू. सर्व गप्प झाले. शेवटी त्यांचा लग्नाच्या वाढदिवस होता,……….!!! त्यांच्या मर्जी प्रमाणे साजरा करू देत म्हणून कोणी जास्तीची चर्चा केली नाही. दोघेच फिरायला जाणार, हे फायनल झाले.

दुसरा दिवस उजाडला, महेशने सुट्टी घेतली होती. गीताला घेऊन तो जवळच कोल्हापूरला, महालक्ष्मी दर्शनासाठी आला. दोघांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. दुपारी पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवण केले. त्या नंतर शाहू पॅलेस पाहण्यासाठी गेले. दोघांमध्ये जेम तेम संवाद होता.कामापुरते बोलणे चालू होते. गीताला आजिबात करमत नव्हते. सर्व काही भावनाशून्य होते……!!!

तिला मनातल्या मनात गुदमरत होते…… महेश बळजबरीने वाढदिवस साजरा करीत आहे.. ….!!!, असा भास होत होता. अता तिच्या भावनांना तिला मोकळे करायचे होते………. आज तिला महेश कडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची होती……. तिने मनात पक्का निर्धार केला होता……….????? एक वर्षापासून होणारा मनाचा कोंडमारा तिला आता असह्य होत होता…………महेश पण अबोल होता त्याच्या पण मनात कांहीं तरी चालले होते….. त्याचे पण आजिबात लक्ष नव्हते…….. आर्धाच शाहू पॅलेस पाहिल्या नंतर गीता म्हणाली मी खूप थकले आहे आपण लॉज वर वापस जाऊ यात…. महेशला पण कंटाळा आला होता. दोघे पण लगेचच लॉज वर परत आले……. गीताने मात्र ठरवले होते की आज कांहीं ही होवो,…. मनातील सर्व प्रश्न विचारायचे ……??????????असे ठरऊन, सर्व धैर्य एकवटून, तिने महेशला बोलायला सुरुवात केली………

“मला कांहीं विचारायचं आहे, मी बोलू का”…??

महेश म्हणाला,” मला तुला कांहीं सांगायचे आहे, त्या साठीच तर मी तुला बाहेर फिरायला घेऊन आलो, नंतर तू बोल, मला अगोदर तुला कांहीं सांगायचे आहे”……!!!

गीता गप्प बसली…………!!!

पुढे महेश म्हणाला, “राग येऊ देऊ नकोस,….. मी तुला आज सत्य सांगणार आहे……. या वर तुला जे बोलायचे ते नंतर बोल”……….

“माझ्या आई वडिलांनी बळजबरी तुझ्या सोबत लग्न ठरवले, तू सावळ्या रंगाची, कमी शिकलेली, राहणीमान साधारण…… मला तू पसंद नसताना देखील…. आई वडिलांन साठी मी लग्न केले. आईला तू अवडायचीस, खुप संस्कारी म्हणून……….. आई नेहेमीच तुझे गोडवे गायची. त्यांच्या शब्दासाठी त्यांना दुखावू नये म्हणून मी तुझ्याशी लग्न केले……. पण…. माझे माझ्या ऑफिस मधल्या मुलीवर प्रेम आहे.

ती मला पहिल्या पासून आवडते, पण आई वडिलांना ती आवडत नाही, तिचे राहणीमान आवडत नाही, म्हणून त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला. घरात बरेच दिवस कोणी कोणाला बोलत नव्हते, शेवटी मी तुझ्या सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तू आज जशी आहेस तशीच तुला ठेवेल,…….!!!माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा करू नकोस. या वर तुला काय निर्णय घ्यायचा तो घे, मला मान्य आहे”.

गीताच्या पायाखालची जमीन सरकली, तीच्या डोळ्या समोर अंधाऱ्या आल्या……. तिला काय होतंय ते कळत नव्हत……..!!! तिच्या मनात आता कोणतेच प्रश्न नव्हते…….. न विचारता सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती……. तिला आता लगेचच जीवन यात्रा संपवावी असे वाटत होते……. ती थोडा वेळ निशब्द झाली…..

महेशच्या हे लक्षात आले…. त्याने तिला पाणी आणून दिले. तू थोडा वेळ विचार कर….. असे म्हणून बाहेर गॅलरीत जाऊन बसला……………. ……..

अचानक चारचा अलार्म वाजला आणि गीता तंद्रितून बाहेर आली.

तिला हे सर्व 15 वर्षा पूर्वी घडलेला प्रसंग जस्यास तसा आठवण्याचे कारण म्हणजे,………. !!!!

अचानक काल तिची आणि महेशची भेट झाली. तब्बल 15 वर्षा नंतर………!!! दोघे रस्त्यात भेटले होते. गीताने ओळखले , हा महेशच आहे, त्याच्यात फारसा बदल झाला नव्हता… पण महेशला ओळखायला थोडा वेळ लागला. दोघे पण घाईत होते. महेश ची मीटिंग होती आणि गीताची पण एका कंपनीच्या मालका सोबत अपॉइंटमेंट होती. महेशने दुसऱ्या दिवशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आणि नक्की भेटण्याचे प्रॉमिस घेतले.गीताची ईच्छा नव्हती तरी देखील, एक वेळ भेटू या, भेटायला काय हरकत आहे…..!!! म्हणून तिने भेटण्या साठी होकार दिला………….

गीताने 15 वर्षा पूर्वीच महेशला सोडून दिले होते. लग्नाचा वाढदिवस, ही त्यांची शेवटची भेट होती. गीताने जिद्दीने ड्रेस डिझायनरचा कोर्स पूर्ण केला होता.गीता आता एक प्रसिद्ध ड्रेस डिझायनर होती. कारण गीताला आता कोठे जगण्याचा अर्थ समजला होता…….

“दर्द सबके एक से है,

मगर हौंसले सबके अलग

अलग है..!

कोई हताश हो के बिखर जाता है,

तो कोई संघर्ष करके निखर जाता है ..!!”

दुसऱ्या दिवशी दोघे एका नामांकित हॉटेल मध्ये भेटले. महेश तिच्याकडे एकटक पाहताच होता.

तिच्यात आता खुप बदल झाला होता. केस कट केले होते, आणि मोकळे सोडले होते. जीन्स पँट आणि टॉप घातला होता. रंग पण बऱ्या पैकी उजळला होता. हलकेसे मेक अप केले होते. खुप खुप सुंदर दिसत होती. तिचे मॉडर्न रूप महेशला आकर्षित करीत होते.15 वर्षा पूर्वीची साधी भोळी गीता….!!! त्याचा विश्वासचं बसत नव्हता……!!! त्याला जशे हवे होते ….तसाच तिच्यात आता बदल झाला होता. तिचे रुप पूर्णतः बदलले होते.

महेशने अचानक तिचा हातात हात घेतला आणि मी तुला परत स्वीकारायला तयार आहे, चल आपण घरी जाऊयात. आई बाबांना भेटूत. त्यांना खुप खुप आनंद होईल…… असे तो म्हणाला. गीताने हळूच हातातून हात काढून घेतला आणि सांगितले पण मी आता तुला स्वीकारायला तयार नाही. मी तुला तुझ्या आग्रहास्तव शेवटचे भेटत आहे. मला तू सोडलेस. तेंव्हा तो तुझा निर्णय होता. आता हा माझा निर्णय आहे. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. पक्का निर्धार दिसून येत होता. तिच्या निर्णयात ठामपणा होता… .!!! आता तिने पूर्णपणे स्वता:लाच प्रॉमिज केले होते, स्वता:च्याच मर्जी प्रमाण जीवन जगायचे…….. योग्यच निर्णय घेतला होता.

तेवढ्यात गीताला एक फोन आला, तिने तो उचलला…….” मॅडम आपल्याला अमेरिकन कंपनीची ऑर्डर मिळाली आहे, आणि त्या साठी उद्याच अमेरिकेला जावे लागेल, एअरलाइन चे उद्याचे बुकिंग करू का……..???

“हो”… म्हणून गीताने फोन ठेवला….. महेशने फोन वरचे बोलणे एकले होते……. टेबल वर कॉफी ची ऑर्डर आली होती. दोघांनी कॉफी घेतली. मला उद्याची तयारी करायची आहे, माझे खूप पेंडींग वर्क आहे….. मला थोडी घाई आहे……असे सांगून गीता तेथून निघाली. महेश हतबल होऊन, बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता.

तिला मात्र तिच्या मैत्रिणीने सांगितलेले वाक्य आठवले….

मंजिल मिले ना मिले _

ये तो मुकदर की बात है!

हम कोशिश भी ना करे

ये तो गलत बात है…

जिन्दगी जख्मो से भरी है,

वक्त को मरहम बनाना सीख लो,

हारना तो है एक दिन मौत से,

फिलहाल जिन्दगी जीना सीख लो………!

आत्मनिर्भर | Self Dependent – अज्ञात लेखिकेंस सादर समर्पित

आत्मनिर्भर | Self Dependent – ज्ञात असल्यास नमूद करावे…

आत्मनिर्भर | Self Dependent हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

आत्मनिर्भर | Self Dependent – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share आत्मनिर्भर | Self Dependent

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock