Everything is history now

सर्व काही आता इतिहास होउन गेलं | Everything is history now

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Everything is history now

लता, आशा आता गात नाहीत

भीमसेन, कुमारचे सुर हरवले

शिवकुमार, हरिप्रसाद ही आता केव्हातरी

आर डी, लक्ष्मी-प्यारे शांत झालेत

कपिल, गावस्कर, तेंडुलकर आता खेळत नाहीत

प्राण, कादर खानची दादागिरी संपलिये

अमिताभ आता फाइटिंग करत नाही

रेखा, हेमा, झिनत, परवीन

सा-यांचं सौंदर्य संपुन गेलय

अटलजींचं ओघवतं हिंदी,

इन्दीवरच्या गाजलेल्या मैफिली

जगजीत, मेहन्दीचा दर्दभरा आवाज

रफी, किशोरची हृदयातली साद

मुकेशचं कारुण्यं, मन्ना डेचा पहाड़ी सुर

सारे सारे निघून गेलेत “कहीं दूर, कहीं दूर”

रेश्माची तानही विरून गेलीये

तलतची मखमल विरून गेलीये

पु.लंचं मिश्किलपणे गोष्टी सांगणं

बापट, विंदा, पाडगावकरांचं कविता ऐकवणं

हृदयनाथ, ग्रेसच्या अविस्मरणीय मैफिली

पल्लेदार संवादांनी जीवंत झालेला

काशीनाथ घाणेकरांचा संभाजी

कड़क, शिस्तप्रिय तरीही प्रेमळ, हवासा

सतिष दुभाषींचा प्राध्यापक

आणि भक्ति बर्वेंची “ती फुलराणी”

नंदू भेंडेने जीवंत केलेला

पु.लंचा “तीन पैशाचा तमाशा”

डॉ. आगाशेंचा “घाशीराम कोतवाल”

विजयाबाईंचं “हयवदन”, “हमिदाबाई”, “बारिस्टर”

जब्बारची “अशी पाखरे येती”

आणि “सिंहासन”

सिंहासनमधली लागु, भटांची जुगलबंदी

सामनामधली लागु, फुलेंची आतिशबाजी

“पुरुष” मधला रास्वट नाना

“चिमणराव” प्रभावळकर

आणि “गुंड्याभाउ” कर्वे

“गज-या”तले आपटे

“प्रतिभा आणि प्रतिमा”ची सुहासिनी मुळगावकर

आकाशानंदांचा “ज्ञानदीप”

तबस्सुमचं “गुलशन गुलशन”

आवाज़ की दुनिया का दोस्त

अमीन सायानिचा दर बुधवारचा

“आज पहली पायदान पर हैं”

म्हणत हृदयाला हात घालणारा आवाज

रविवारचा विविधभारतीवरचा

“एस. कुमार का फिल्मी मुक़दमा”

आणि रेडियो सीलोन वरचा

सैगल चा समारोप स्वर

दर एक तारखेला नं चुकता लागणारं

किशोरचं “दिन हैं सुहाना आज पहली तारीख हैं”

म्हणून आठवण करून देणं नाही

तल्यारखान, लाला अमरनाथचा आणि विजय मर्चंटचा

कानात प्राण आणून

ऐकलेला “आँखों देखा हाल”

आणि black and white मधे

बघितलेली 1980 ची

बोर्ग आणि मॅकेन्रो फाइनल

तर 1983 ची

क्रिकेट वर्ल्ड कपची फाइनल

कॉलेज बंक करुन पाहिलेले

मिथुनचे पिक्चर

झिनतची कुर्बानी

अमिताभ-शत्रुचा दोस्ताना

धर्मेन्द्रचा ओरिजिनल ढाई किलो का हाथ

जितेन्द्र-श्रीदेवीचे आचरट विनोद

अमजद-कादर-शक्ति कपूरची

विचित्र विनोदी विलनगिरी

राजेश खन्नाचा रोमँटिक अंदाज

थिएटरमधली विस विस आठवडे

ओसंडणारी गर्दी

ब्लैक मधे टिकिट घेताना

केलेली मारामारी

सर्व काही आता इतिहास होउन गेलं

आठवणींच्या कप्प्यात मात्र सुरक्षित राहून गेलं

आजकाल आता ती असोशी नाही

ऊर फाटेस्तोवर धावून

“फर्स्ट डे फर्स्ट शो ” पाहणं नाही

सतराशे साठ चैनल्स वरुन चोवीस तास

सिनेमे आणि मनोरंजन कोसळत असतं

पण त्यामधे अता ती पूर्वीची

हूरहूर अन अप्रूप नाही

खुप वेळ try करून एकदाचा

“तिने” उचललेला फ़ोन नाही

तिच्या बापाने नाहीतर भावाने

फोनवरून दिलेल्या शिव्या नाहीत.

फेसबुक, व्हाट्स एप,एस एम् एस

आणि मोबाइल च्या जमान्यात

टेलीफोन ची गम्मत नाही

तासन तास बिल्डिंग खाली उभं राहून

वाट पाहणं नाही

मनातलं कळवण्यासाठी

रात्र रात्र जागुन पत्रं लिहिणं नाही

सेकंदात फेसबुक वर अपडेट होण्याच्या जमान्यात

पत्राची वाट पाहण्यातली आतुरता आणि मजा नाही.

हातातून निसटुन गेलेल्या वाळुच्या कणांसारखं

हे सारं केव्हा निसटुन गेलं ओंजळीतून

खरं तर कळलंही नाही

पण आयुष्याच्या मध्यान्ही ?

हे सारं आठवताना खुदकन हसतो

भुतकाळाच्या हिंदोळ्यावर

कितीतरी काळ झुलत राहतो

खरंच तो काळ किती सुन्दर होता

सारं काही साधं, सरळ नि सोपं होतं

यंत्र आणि माणसंसुद्धा

आता माणसांचीच यंत्र झालीत

आणि यंत्र माणसांसारखी वागु लागलीत

प्रेम, स्नेह, आदर, जिव्हाळा

हे शब्द आता फ़क्त शब्द कोशातच सापडतात

तरीही जुनी मित्र मंडळी भेटली

की तेवढ्या पुरते जिवंत होतात

-तेवढ्या पुरते जिवंत होतात ( Everything is history now )

Everything is history now -©️अभिजित दिघोळे

सर्व काही आता इतिहास होउन गेलं | Everything is history now

सर्व काही आता इतिहास होउन गेलं | Everything is history now – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share सर्व काही आता इतिहास होउन गेलं | Everything is history now

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO